Rajyasabha Seat for Vinesh Phogat: विनेश फोगटला फक्त १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे भारतीयांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. विनेश फोगटनं आता CAS कडे रौप्यपदक मिळावं अशी मागणी करणारी याचिका दाखल केली असून हरिश साळवे तिची बाजू मांडणार आहेत. मात्र, IOA नं नियमानुसार एकाच गटात दोन रौप्य देता येणं शक्य नसल्याचं नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर विनेश फोगट चर्चेत असताना आता तिला राज्यसभा उमेदवारी देण्याची मागणीही नियमामुळे पूर्ण होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमांवर बोट ठेवण्यात आलं होतं. अनेक आजी-माजी कुस्तीपटूंनी व इतर खेळाडूंनीही विनेशची बाजू घेत नियमांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर विनेश फोगटनं सीएएसकडे दाद मागितली असून त्यावर सुनावणी चालू आहे. यासंदर्भात ऑलिम्पिक संपायच्या आत निकाल दिला जाईल, असं सीएएसकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यातच विनेश फोगटनं कुस्तीमधून निवृत्ती घेतली असून आता पुढील वाटचाल काय असेल? यावर चर्चा चालू असतानाच तिच्या राज्यसभा उमेदवारीबाबत मुद्दा मांडण्यात आला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Rajapur Lanja Avinash Lad , Rajapur Lanja,
रत्नागिरी : राजापुर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे अविनाश लाड यांचे पक्षांकडून निलंबन
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Vinesh Phogat Disqualification Appeal Updates Paris Olympics 2024 in Marathi
विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? (फोटो – रॉयटर्स)

“…तर विनेशला राज्यसभेवर पाठवलं असतं”

“विधानसभेत काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ असतं, तर विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं”, असं विधान काँग्रेसचे हरियाणातील ज्येष्ठ नेत भूपिंदर हुड्डा यांनी व्यक्त केलं आहे. स्वत: हुड्डा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यसभेत त्यांच्याजागी विनेश फोगटला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मात्र, नियमानुसार विनेश फोगटला फक्त ४ दिवसांच्या अंतरामुळे राज्यसभा उमेदवारी देणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नियम काय सांगतो?

राज्यसभेच्या नियमानुसार, सदस्यत्वासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय ३० वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. पण विनेश फोगटचं वय ३० वर्षे पूर्ण नाही. विनेशचा वाढदिवस २५ ऑगस्ट रोजी असतो. त्यामुळे २५ ऑगस्ट २०२४ रोजी विनेश फोगट ३० वर्षांची पूर्ण होईल. राज्यसभेतल्या १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विनेश फोगट ३० वर्षांची पूर्ण असेल. पण निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार राज्यसभा निवडणुकीसाठी १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख २१ ऑगस्ट ठरवण्यात आली आहे. या अर्जामध्ये उमेदवारांना आपलं वय नमूद करणं आवश्यक आहे. २१ ऑगस्ट २०२४ रोजी विनेश फोगटचं वय २९ वर्षे ११ महिने २६ दिवस इतकं असेल. त्यामुळे ३० वर्षे पूर्ण करण्यासाठी फक्त ४ दिवस कमी पडत असल्यामुळे विनेश फोगटला जर राज्यसभा उमेदवारी दिली, तरी तिचा अर्ज निवडणूक आयोगाकडून बाद केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विनेश फोगटला राज्यसभेची उमेदवारी मिळण्यात हे ४ दिवसांचं अंतर मोठा अडसर ठरलं आहे.

बबिता फोगटची टीका

दरम्यान, विनेश फोगटला राज्यसभा उमेदवारी देण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर तिची चुलत बहीण, माजी कुस्तीपटू व भाजपा नेतेपद असणारी बबिता फोगटनं टीका केली आहे. “संकटाच्या प्रसंगी राजकीय संधी साधणं काँग्रेसकडून शिकलं पाहिजे. एकीकडे संपूर्ण देश आणि स्वत: विनेश तिच्या ऑलिम्पिकमधून अपात्र होण्याच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसताना दुसरीकडे दीपेंद्र हुड्डा आणि त्यांच्या वडिलांनी विनेशच्या या पराभवावर राजकारण सुरू केलं आहे. काँग्रेसला खेळाडूंच्या दु:खाशी काहीही देणं-घेणं नाही. हे फार लाजिरवाणं आहे”, अशी पोस्ट बबिता फोगटनं केली आहे.