पीटीआय, इम्फाळ

इम्फाळ शहरातील हिंसाचार सुरूच असून शुक्रवारी रात्रभर जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात संघर्ष सुरू होता. संतप्त जमावाने भाजपची कार्यालये आणि भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे रात्री स्वयंचलित बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर इम्फाळ पश्चिमला इिरगबम पोलीस ठाण्यातून जमावाने पोलिसांची शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला.

Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…

हिंसाचाराची तीव्रता इम्फाळ शहर आणि जिल्ह्यात अधिक आहे. सुमारे एक हजार जणांच्या जमावाने इम्फाळमधील राजवाडय़ाजवळील इमारती जाळण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी शिघ्र कृती दलाने अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि रबराच्या गोळय़ा झाडल्या. दंगलखोरांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि शिघ्र कृती दलाने इम्फाळमध्ये मध्यरात्री संयुक्त संचलनही केले.
केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करून ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एका निवृत्त आदिवासी सनदी अधिकाऱ्याच्या मालकीचे गोदामही जमावाने जाळून टाकले होते.

काय घडले?

’भाजपचे आमदार विश्वजीत यांचे घर जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला, मात्र शीघ्र कृती दलाने जमावाला पांगवले. ’

आणखी एका जमावाने मध्यरात्री सिंजमाई येथील भाजप कार्यालयाला घेरले होते, परंतु लष्कराने जमावाला हुसकावून लावले.

’शुक्रवारी मध्यरात्री इम्फाळमधील पोरमपेटजवळ भाजपच्या महिला शाखा अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराची तोडफोड करण्याचा प्रयत्न जमावाने केला.