इस्लामाबाद, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल-कादीर विश्वस्त मंडळ भ्रष्टाचारप्रकरणी आठ दिवसांची नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) कोठडी सुनावण्यात आली. इम्रान यांना बुधवारी एनएबी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापूर्वी, इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात आरोप निश्चित केल्यामुळे इम्रान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

एनएबीने इम्रान खान यांची १४ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली तर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या मुक्ततेची मागणी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन इम्रान यांना ठेवलेल्या इस्लामाबादमधील न्यू पोलीस गेस्ट हाऊसचे रूपांतर न्यायालयात करण्यात आले. अल-कादीर विश्वस्त मंडळाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीचे ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

त्यापूर्वी, इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान यांच्याविरोधात आरोप निश्चित केले. इम्रान पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या किमती घडय़ाळांसारख्या महागडय़ा भेटवस्तू त्यांनी तोशखाना विभागाकडून स्वस्तात विकत घेतल्या होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे. नियमानुसार लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना मिळालेल्या भेटवस्तू तोशखाना विभागाकडे जमा कराव्या लागतात. यासंबंधी केलेल्या व्यवहारांसंबंधी लपवाछपवी केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पाकिस्तान तेहेरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांना मंगळवारी झालेल्या अटकेचे उच्च न्यायालयाने समर्थन केले. त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली. इम्रान यांच्यावर ठेवण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे गलिच्छ आणि सूडाचे राजकारण असल्याची टीका पीटीआयने केली.

तीन प्रांतांमध्ये सैन्य तैनात

पाकिस्तानच्या पंजाब, खैबर पख्तुनख्वाह आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. इम्रान खान यांना अटक झाल्यापासून पाकिस्तानात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. क्वेट्टा, कराची, रावळिपडी आणि लाहोर यासह इतर शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. इम्रान यांचे समर्थक आणि सुरक्षा बलांमध्ये झालेल्या संघर्षांमध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर ३०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

पीटीआयच्या समर्थकांनी पंजाब प्रांतामध्ये किमान १४ सरकारी आस्थापनांना आगी लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकटय़ा पंजाबमध्ये आतापर्यंत १ हजार १५० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पीटीआयच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. लाहोर आणि अन्य शहरांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. लाहोरमध्ये लोक रस्त्यावर उतरल्यामुळे शहराचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे. हिंसक आंदोलकांवर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या ‘असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान’च्या कार्यालयाचीही तोडफोड केली. निदर्शकांनी इस्लामाबादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता अनेक तास रोखून धरला. सिंध प्रांतामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून २७० जणांना अटक करण्यात आली आहे.

भारतीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया

अस्थिर पाकिस्तान हा भारतासह सर्व देशांसाठी धोकादायक आहे असा इशारा जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिला. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानात लोकशाही मजबूत होणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधही सुधारतील असे ते म्हणाले. तर पाकिस्तानातील लोकशाही डळमळीत असली तरी न्यायपालिका, प्रसारमाध्यमे प्रस्थापितांना जबाबदार धरत आहेत ही काळय़ा ढगांची रुपेरी किनार आहे, अशी प्रतिक्रीया पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दिली.

शाहबाज शरीफ यांना क्लिन चीट

इस्लामाबाद : एनएबीने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मुलगा हमजा यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात क्लिन चीट दिली. यामुळे शरीफ पितापुत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. १६ अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा पुन्हा तपास केल्यानंतर हे दोघेही निरपराध असल्याचे दिसून आले, असे एनएबीकडून जाहीर करण्यात आले.