Violence in UK India on Alert mode : बांगलादेशप्रमाणे ब्रिटनमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे. देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर येत आहेत. साऊथपोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साऊथपोर्टमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, भारत सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत असून त्यांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. तसेच भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी प्रवासी सूचना जारी करताना म्हटलं आहे की भारतीय प्रवाशांना युनायटेड किंगडममधील काही भागात घडत असलेल्या हिंसक घटनांची माहिती असेल. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून यूकेल येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की त्यांनी यूकेला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी. स्थानिक वृत्त व स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. ज्या-ज्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, हिंसाचार चालू आहे तिथे जाऊ नये.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

अलीकडेच लिवरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम व मॅन्चेस्टरमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. देशात आलेले शरणार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. कित्येक दुकानांवर हल्ले झाले आहेत. अनेक दुकानं व वाहनांना आग लागवण्याचे प्रकार समोर येत आहेत. जमाव व पोलिसांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत. यात काही पोलिस व नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, ब्रिटनचे गृहमंत्री यावेट कूपर यांनी हिंसा करणाऱ्या जमावाला इशारा दिला आहे की असे गुन्हे करणाऱ्यांना, हिंसा करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.

हे ही वाचा >> Bangladesh Violence : दहशतवाद्यांसह ५०० कैदी बांगलादेशच्या तुरुंगातून फरार, भारताची चिंता वाढली?

शेख हसीना लंडनला जाणार असल्याची चर्चा

दरम्यान, बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्या बांगलादेशमधून पलायन करत भारतात दाखल झाल्या आहेत. काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की शेख हसीना या भारतमार्गे लंडनला जाणार आहेत. भारत सरकार व भारतीय वायू सेना यामध्ये त्यांची मदत करू शकते.