मध्य प्रदेशात दातिया जिल्हय़ातील डांग करेरा खेडय़ात बावीस वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला असून, त्यात भाजपच्या एका नगरसेवकाचाही समावेश आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. मंगळवारी रात्री सामूहिक बलात्काराची ही घटना घडल्याची माहिती जिगना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भाजपचे दातिया पालिकेचे नगरसेवक बालकिशन कुशवाह हे पाच आरोपींपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात पाच आरोपींची नावे आहेत. दिराबरोबर शेरशा खेडय़ाहून परत डांग करेरा या आपल्या गावाकडे परत येत असताना या शस्त्रधारी पाच व्यक्तींनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या महिलेने पोलिसांना सांगितले, की या पाचजणांनी आम्हाला अडवले व दिरावर हल्ला केला. नंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मध्य प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजय सिंग यांनी सांगितले, की दातिया जिल्हा हा आता गुन्हेगारीची राजधानी बनला आहे. याच जिल्हय़ात स्वित्र्झलडच्या पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना १५ मार्चला घडली होती. अजय सिंग यांनी सांगितले, की आताच्या सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचा नगरसेवक सहभागी ही लांच्छनास्पद बाब आहे.
अत्याचार थांबेना!
मध्य प्रदेशात दातिया जिल्हय़ातील डांग करेरा खेडय़ात बावीस वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला असून, त्यात भाजपच्या एका नगरसेवकाचाही समावेश आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. मंगळवारी रात्री सामूहिक बलात्काराची ही घटना घडल्याची माहिती जिगना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
First published on: 11-04-2013 at 05:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence not stoping