पीटीआय, गुवाहाटी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आसामच्या नागाव जिल्ह्यात १४ वर्षीय मुलीवर तीन जणांनी केलेल्या कथित बलात्काराच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धिंग परिसरात दहावीत शिकणारी विद्यार्थिनी शिकवणी संपवून सायकलवरून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हल्ला करत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जखमी आणि बेशुद्धावस्थेत एका तलावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिले. स्थानिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा >>>Bus Accident : ४० भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

मुख्यमंत्री सर्मा यांनी हैलाकांडी येथे पत्रकारांना सांगितले की, धिंग येथील अल्पवयीन हिंदू मुलीबरोबर असा जघन्य गुन्हा करण्याचे धाडस करणाऱ्या गुन्हेगारांना कायदा सोडणार नाही. सर्मा यांनी आरोप केला की, ‘लोकसभा निवडणुकीनंतर एका विशिष्ट समुदायातील सदस्यांचा एक भाग खूप सक्रिय झाला आहे आणि त्यांना अशा प्रकारचा गुन्हा करण्यास उसकवले जात आहे. मात्र, आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करू आणि कुणालाही सोडले जाणार नाही.’

दरम्यान, गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत समाजातील विविध स्तरातील लोक शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवत सामाजिक आणि राजकीय संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेची मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violent protests in assam over the gang rape of a minor girl amy