लोकांची जीव वाचवण्याचे काम डॉक्टर ज्याप्रमाणे करतात. त्याचप्रमाणे जखमींना वेळेत रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहीका चालकही आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात. मात्र, इतरांचे प्राण वाचवणाऱ्या एका रुग्णवाहीका चालकासोबत जो प्रकार घडला आहे तो वाचून तुमचे डोळे देखील पाणवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलेशियातील एका रुग्णावाहिका चालकाला रस्त्यावर मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो सवयीप्रमाणे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेला. मात्र, अपघातच्या ठिकाणी जाताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण रस्त्यावर त्याच्याच मुलाचा मृतदेह पडला होता.

आणखी वाचा- गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा ‘काला चष्मा’वर भन्नाट डान्स; Viral Video पाहून मिळेल जगण्याची नवी प्रेरणा

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल असं ४९ वर्षीय रुग्णवाहिका चालकाचं नाव असून तो सुंगाई टोंग हेल्थ क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. इस्माईल यांना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. इमरजन्सी कॉलमुळे ते तत्परतेने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी घटनास्थळी असणारी आपल्या मुलाची दुचाकी ओळखली आणि त्यांना आपल्या मुलाचा अपघात झाल्याचं कळालं. मात्र, मुलगा किरकोळ जखमी झाला असेल असं त्यांना वाटलं. पण दुर्दैवाने त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजताच त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, “मी गेली २१ वर्षापासून रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहे. मात्र, आपल्याचं कुटुंबातील सदस्याला रुग्णवाहिकेतून नेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी मला काय वेदना झाल्या हे फक्त देवालाच माहीत” अशा शब्दात रुग्णवाहिका चालकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा- Whatsapp वरील माहितीच्या आधारे सापडला बलात्कार प्रकरणातील आरोपी, पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवल्यानंतर गुन्ह्याची उकल

पोलिसांनी सांगितलं की, रुग्णवाहीका चालक मोहम्मद इस्माईल यांचा मुलगा मुहम्मद ऐमान हा त्याच्या घरी जात असताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकसोबत त्याच्या दुचाकीची धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की त्यामध्ये ऐमानचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा आणि धोकादायक ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याची नोंद केली असून. पुढील प्रकरणाचा तपास ते करत आहेत.

घरी जेवायला येण्याची इच्छा राहिली अपुर्ण –

२१ वर्षीय ऐमान हा ‘तमन तमादान इस्लाम लैंडस्केप यूनिट’ मध्ये पाच महिन्यापासून कामाला येत होता. शिवाय तो रोज कामावर येताना आपला डबा घेऊन यायचा मात्र आज त्याने डबा आणला नव्हता. शिवाय आपणाला घरी जाऊन जेवायचं असल्याचंही कामावरील सहकाऱ्यांशी बोलला होता. अशातच त्याच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.