Boat Capsizes in Ganga River : वाराणसी येथील मन मंदिरासमोर शुक्रवारी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली. पोलीस आणि एनडीआरएफचे जवान घटास्थळी पोहोचले असून प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बोट उलटल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती परसली. परंतु, एनडीआरएफच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. घाटावरील लोकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी पोलिसांनी माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. सर्व लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

१८ जणांचा जीव वाचवण्यात यश

डीसीपी सरवणन टी. यांनी सांगितलं की, “१८ जण बोटीवर होते आणि सर्वांची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर आयुक्तालय पोलिसांनी ओव्हरलोडिंगबाबत सक्त ताकीद दिली असून गंगा नदीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.”

एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार, मन मंदिर घाटाजवळ दोन बीटींची टक्कर झाली. यामुळे एक बोट उलटली. घटनेनंतर लगेच एनडीआरएफची टीम दाखल झाल्याने प्रवाशांचा जीव वाचला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयजी मनोज कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ टीम वाराणसीतील सर्व प्रमुख घाटांवर आणि गंगेच्या मध्यवर्ती भागात फुगवता येणाऱ्या बचाव बोटींसह चोवीस तास दक्षता राखते.