झज्जर जिल्ह्यातील बहादुरगढमधील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली असून, समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास आपण डॉक्टर असल्याचे भासवून पहाटे साडे तीनच्या सुमारास आरोपी अतिदक्षता विभागात (आयसीयू) घुसल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. पीडित महिला ही दिल्ली पोलीसदलात कार्यरत असलेल्या पोलीस उप-निरीक्षकाची पत्नी आहे. सदर महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना घडली त्यावेळी ‘आयसीयू’ कक्षात रुग्णालयाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा अतिप्रसंग ओढाविल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असून, ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झालेल्या आरोपीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा