बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने अजब शिक्षा दिली. पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर नेऊन बलात्कार केला होता. मात्र पंचायतीने आरोपीला पोलिसांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आरोपी बलात्काराचा दोषी असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. मुलीला एका निर्जनस्थळी नेलं असल्याने पंचायतीने आरोपीला ही शिक्षा सुनावली.

पंचायतीने आरोपीला शिक्षा म्हणून पाच उठाबशा काढायला लावल्या. या शिक्षेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर अनेकांनी याविरोधात संताप व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही पोलीस चौकशी करणार असून, कारवाईची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a man accused of raping minor let off with sit ups in bihar sgy