रशियातील मॉस्कोमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला घडवून आणलेल्या दहशतवादी संघटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना जबाबदार धरलं आहे. तसंच, बराक ओबामा आयएसआयएसचे संस्थापक असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांचा एक व्हीडिओ यासंदर्भातील व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. बराक ओबामा हे आयएसआयएसचे संस्थापक आहेत. आयएसआयएस ओबामांंचा सन्मान करतं. बराक ओबामा यांनीच आयएसआयएसची स्थापना केली आहे. तर, हिलरी क्लिंटन या संस्थेच सहसंस्थापक आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प या व्हीडिओमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ नवा नसून जुना व्हीडिओ आहे. २०१६ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं होतं. परंतु, आता मॉस्कोच्या हल्ल्यानंतर हा व्हीडिओ व्हायरल झाला.

मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब

रशियातील एका सभागृहात १३० जणांना ठार करणारा हल्ला घडवून आणल्याचा आरोप असलेल्या चौघांना रविवारी मॉस्कोतील एका न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघांच्या अंगावर बेदम मारहाण करण्यात आल्याच्या खुणा होत्या. एकजण सुनावणीदरम्यान जेमतेम शुद्धीत होता.

दोन आरोपींनी या हल्ल्यासाठी आपण दोषी असल्याचे न्यायालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या लोकांची परिस्थिती पाहता ते मुक्तपणे बोलत होते का याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे. तिघांनी अथवा चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला असल्याबाबत रशियन माध्यमांमध्ये परस्पर विसंगत बातम्या प्रकाशित झाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows donald trump calling barack obama founder of isis after moscow attack but heres the truth sgk