Viral Video UP moradabad news : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील एका मशिदीत नमाज पठण करायला आलेल्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की दोन गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकमेकांना कमरेच्या पट्ट्याने, सळई व काठीने मारत आहेत. संधी मिळेल तेव्हा समोरच्या गटातील लोकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. मुरादाबादमधील पकबडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात ही मशीद आहे. दरम्यान, या मारहाणीत एक डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हाणामारीत अनेकांचे कपडे फाटले आहेत. ही घटना शुक्रवारच्या नमाज पठणावेळी घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ह हाणामारी कशामुळे झाली ते अद्याप कळू शकलेलं नाही. मशिदीसारख्या प्रार्थनास्थळी अशी घटना घडल्याचं पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हे ही वाचा >> Church Fire : दोन महायुद्धं बघितलेल्या फ्रान्समधील ऐतिहासिक चर्चला भीषण आग; एलॉन मस्कना घातपाताची भीती

शुक्रवारची नमाज पठण करत असताना राडा

शुक्रवारची नमाद पठण करण्यासाठी पकबडा येथील मुस्लीम समुदाय मशिदीत जमला होता. सर्व लोक नमाज पठण करत असतानाच या हाणामारीला सुरुवात झाली. ही हाणामारी बराच वेळ चालली. मात्र कोणीही त्यांना थांबवलं नाही. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांनाही मार पडल्यानंतर ते बाजूला झाले. हा राडा होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.