अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात डीडीसीएमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मात्र, विरोधक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.
मी दिल्ली क्रिकेट संघामधून खेळत असताना मला एखाद्या खेळाडूची निवड आश्चर्यकारक वाटली तर, मी लगेच अरुण जेटलींना सांगायचो आणि ते योग्य खेळाडूला न्याय मिळवून द्यायचे तसेच अरुण जेटली खेळाडूंसाठी नेहमी उपलब्ध असायचे , असे विरेंद्र सेहवागने म्हटलेय. तर डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल जेटलींवर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी प्राप्तीकर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा न वापरता दिल्लीत स्टेडियम उभारले. माजी खेळाडूंकडून त्यांच्यावर आरोप करणे, दुर्भाग्यपूर्ण आहे, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
अरुण जेटली २०१३ पर्यंत वर्षे डीडीसीएचे अध्यक्ष होते.
सेहवाग, गंभीरचा अरुण जेटलींना पाठिंबा
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-12-2015 at 14:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag gautam gambhir praise arun jaitley for being there for the players