चित्रपटाचे दिग्दर्शक- अभिनेते कमल हसन यांनी मुस्लीम संघटनांशी शनिवारी केलेल्या वाटघाटींना यश आल्यामुळे अखेर रविवारी विश्वरुपम या तामिळ चित्रपटाच्या तामिळनाडूतील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आह़े .
चित्रपटातील काही दृश्यांमुळे आपल्या भावना दुखावल्याचे कारण सांगत मुस्लीम संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शविल्यानंतर संपूर्ण तामिळनाडूमधील जिल्हाधिकाऱ्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश काढले होत़े चित्रपट प्रदर्शनामुळे हिंसाचाराची शक्यता आह़े राज्यातील सर्व ५२४ चित्रपटगृहांना सुरक्षा पुरविण्यास आम्ही सक्षम नाही, असे सांगत मुख्यमंत्री जयललिता यांनी या बंदीचे समर्थन केले होत़े मात्र मुस्लीम संघटनांनी हिरवा कंदील दाखविल्याने आदेश सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मागे घेतले आहेत़
चित्रपटावर बंदी आल्यानंतर कमल हसन यांनी धर्मनिरपेक्ष जागा शोधण्यासाठी देशात किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याची धमकी दिली होती़ तसेच आपले घर या महागडय़ा चित्रपटनिर्मितीसाठी गहाण असल्याचे भावनिक ‘गुपित’ही त्यांनी सांगितले होत़े इतके होऊनही बंदी उठत नसल्याने बंदीविरोधात न्यायालयाचे दारही हसन यांनी ठोठावले होत़े अखेर शासनाच्या मध्यस्थीने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मुस्लीम संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली आणि चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला़ त्यामुळे हसन यांनी २३ जानेवारी रोजी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आह़े
अखेर ‘विश्वरुपम ’ तामिळनाडूतही प्रदर्शित
चित्रपटाचे दिग्दर्शक- अभिनेते कमल हसन यांनी मुस्लीम संघटनांशी शनिवारी केलेल्या वाटघाटींना यश आल्यामुळे अखेर रविवारी विश्वरुपम या तामिळ चित्रपटाच्या तामिळनाडूतील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आह़े .
First published on: 04-02-2013 at 04:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishvrupam released in tamilnadu at the last