अभिनेता, निर्माता कमल हसन यांचा ‘विश्वरूपम’ हा वादग्रस्त चित्रपट शुक्रवारी अखेर केरळमध्ये प्रदर्शित करण्यात आला़  काही मुस्लीम संघटनांनी चित्रपटाविरुद्ध निदर्शने केल्यामुळे आंध्र प्रदेशात चित्रपटाचे प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आह़े, तर हैदराबादमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीच चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले आह़े
सुरुवातीच्या माहितीनुसार, २५ टक्के लोकसंख्या मुस्लीम असलेल्या केरळमधील ८६ चित्रपटगृहांमध्ये ‘विश्वरूपम’ प्रदर्शित करण्यात आला होता़  शुक्रवारी मुख्यत: ब वर्गातील चित्रपटगृहांतच तो प्रदर्शित करण्यात आला होता, असे केरळ सिने एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही़  मोहनन यांनी तिरुअनंतपुरम् येथे सांगितल़े
हैदराबादमध्ये पोलिसांनीच पुढाकार घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन रोखल़े  सामाजिक शांततेस बाधा येऊ नये म्हणून ‘विश्वरूपम’चे प्रदर्शन रोखण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यासाठी हैदराबाद आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त आपल्याकडे आले होते, असे गृहमंत्री सविता इंद्रा रेड्डी यांनी सांगितल़े  तसेच काही धार्मिक नेते मंडळींनीही आपल्याकडे येऊन चित्रपट प्रदर्शनामागील धोका व्यक्त केला़  परंतु, शासनाकडून या चित्रपटावर कोणतीही बंदी नाही़  चित्रपटाचे प्रदर्शन केवळ एका दिवसाने पुढे ढकलण्यात यावे, इतकेच पोलिसांचे म्हणणे आहे, असेही रेड्डी पुढे म्हणाल्या़
कर्नाटकातही या चित्रपटाचे प्रदर्शन २७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आह़े  ‘ईद मिलाद-उल्-नबी’ आणि प्रजासत्ताक दिनी या दोन सणांच्या पाश्र्वभूमीवर जातीय सलोखा आणि शांततेला बाधा येऊ नये, म्हणून प्रदर्शन पुढे ढकलण्याचे आवाहन राज्य पोलिसांकडूनच करण्यात आले होत़े  त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटकातील वितरण गंगाराजू यांनी सांगितल़े  या निर्णयामुळे आगाऊ नोंदणी करणाऱ्या प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितल़े  दरम्यान, कमल हसन यांच्या काही चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित न झाल्याच्या निषेधार्थ फलक हाती घेऊन जोरदार घोषणबाजी केली़  हा निषेध शांततापूर्ण होता, असे पोलिसांनी सांगितल़े  तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनीही कमल हसन यांना पाठिंबा दर्शविला आहे आणि चर्चेतून समस्या सोडविण्याचे आवाहन मुस्लीम समाजाला केले आह़े
माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री मनीष तिवारी यांनी मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाचे समर्थन करीत सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलेल्या चित्रपटावर बंदी घालण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आह़े  या प्रकरणी तामिळनाडू शासनाने घातलेल्या १५ दिवसांच्या बंदीविरोधात कमल हसन यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होत़े  २६ जानेवारी रोजी चित्रपट पाहून २८ जानेवारी रोजी त्यावर निर्णय देण्याचे न्यायालयाने मान्य केले आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा