Vivek Ramaswamy Trolled On Social Media: डेमोक्रॅटीक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लढलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेत त्यांच्या घरी अनवाणी मुलाखत देताना विवेक रामास्वामी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी लाईव्ह स्ट्रीम दरम्यान रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, काही टीकाकारांनी त्याच्या कृतींना “असभ्य” आणि “अमेरिका विरोधी” असल्याचे म्हटले आहे.

समालोचक इयान माइल्स चेओंग यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामास्वामींचा बचाव केला आहे. त्यांनी रामास्वामी यांच्यावरील टीका “सर्वात मूर्ख युक्तिवाद” असल्याचे म्हटले आहे. “घरात अनवाणी चालणे हे अजिबात अमेरिका विरोधी नाही,” चेओंग म्हणाले, “कदाचित टीकाकारांवर अशा सिटकॉमचा प्रभाव पडला असेल ज्यात पात्रे झोपतानाही बूट घालतात, मला वाटते की, बरेच लोक सिटकॉम पाहत मोठे झाले आहेत ज्यातील पात्रे झोपतानाही बूट घालताना दाखवले आहे.’

सोशल मीडियावरून टीका

माइल्स चेओंग यांनी रामास्वामी यांचा बचाव केल्यानंतरही, अनेक टीकाकारांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले की, “विवेक कधीही ओहायोचा गव्हर्नर होणार नाही. हे अमेरिकेला अस्वीकार्य आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले: “पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली साम्राज्याच्या पदासाठी मुलाखत देताना तुम्ही किमान सॉक्स घालायला हवेत, बरोबर?” तर, तिसऱ्या एका युजरने रामास्वामीच्या बूट काढण्याच्या निवडीवर आक्षेप घेतला आणि लिहिले, “विवेक अनवाणी असताना शिक्षणाबद्दल आपल्याला व्याख्यान देत आहेत.”

भारतीय परंपरेत…

रामास्वामी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना, काहींनी रामास्वामीचा बचाव केला आणि त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, दक्षिण आणि पूर्व आशियासह अनेक संस्कृतींमध्ये घरात बूट काढणे ही एक सामान्य पद्धत आहे. “जवळजवळ सर्व भारतीय त्यांच्या घरात अनवाणी राहतात. यात काहीही चूक नाही. ही फक्त एक सांस्कृतिक गोष्ट आहे,” अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने भारतीय परंपरेबद्दल टिप्पणी केली, “भारतीय परंपरेत, एखाद्याच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपले बूट काढण्याची प्रथा आहे, ते आदर आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते, कारण यामुळे बाहेरून घाण आणि जंतू घरात येत नाहीत. प्रवेश करण्यापासून रोखते;” ही पद्धत मोठ्या प्रमाणात पाळली जाते.

Story img Loader