‘ईडी’ने आमची बॅंक खाती गोठावल्यामुळे आमच्या व्यवसायात अडथळा निर्माण होतो आहे, अशी तक्रार VIVO इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. ईडीने आमची बॅंक खाती गोठावल्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगारही देणं शक्य नाही, असेही VIVO ने न्यायालयात सांगितले आहे.

VIVOने नेमकी काय तक्रार केली आहे?

ईडीने आमची बॅंक खाती गोठावल्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगारही देणं कंपनीला अशक्य होत आहे. यामुळे आमचे अनेक कामे ठप्प झाली आहे. आम्हाला कर द्यायचा आहे. तसेच आम्हाला TDS ही भरायचा आहे. आमच्याकडे नऊ हजार कर्मचारी काम करतात. त्यांना पगार द्यायचे आहे. त्यामुळे आमच्या कंपनीवर कर्जाचा भार होतो आहे, अशी तक्रार VIVOने न्यायालयात दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ईडीने एका मनी लॉंड्रींग केसमध्ये VIVO इंडियाची सर्व बॅंक खाती गोठवली आहे. VIVO इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध कंपनी स्थापन करत मनी लॉंड्रींगसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच विवो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड (जीपीआयसीपीएल) संबंधित देशभरातील 48 ठिकाणे छापा देखील टाकल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते.

हेही वाचा – Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

Story img Loader