मॉस्को : युक्रेनने २०२२ मध्ये त्यांच्या हद्दीत जोडलेल्या चार भागातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आणि नाटोमध्ये सामील होण्याची योजना सोडली तर रशिया युक्रेनमध्ये युद्धविराम करण्याचे आदेश देईल आणि वाटाघाटी सुरू करेल असे आश्वासन शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले. असा प्रस्ताव कीवसाठी निरुपयोगी वाटतो कारण त्याला नाटो लष्करी आघाडीत सामील व्हायचे आहे. पुतीन यांच्या प्रस्तावावर युक्रेनकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, यापूर्वी युक्रेननेही रशियाने आपल्या सर्व भागातून त्यांचे सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> कोची विमानतळावर हृदयद्रावक स्थिती; ३१ भारतीयांचे मृतदेह पोहोचताच प्रियजनांचा शोक

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात पुतिन म्हणाले की, जी-७ सदस्य देशांसह अनेक जागतिक नेते युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, स्वित्झर्लंड या आठवड्याच्या शेवटी अनेक जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. ज्यामध्ये रशिया उपस्थित राहणार नाही. युक्रेनमधील संघर्षावर ठोस तोडगा काढणे हा त्यांचा प्रस्ताव असल्याचे पुतीन यांनी सांगितले. रशिया कोणताही विलंब न करता चर्चा सुरू करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या शांततेच्या मागण्यांच्या सर्वसमावेशक यादीमध्ये युक्रेनचा अण्वस्त्र नसलेला दर्जा, त्याच्या लष्करी दलांवरील निर्बंध आणि युक्रेनमधील रशियन भाषिक लोकांच्या हिताचे संरक्षण यांचा समावेश आहे.