Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सलग पाचव्यांना पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. रॉयटर्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे. रविवारच्या निकालांनुसार व्लादिमीर पुतिन यांना ८७.९७ टक्के मतांनी विजय मिळवल्याचं रॉयटर्सने म्हटलं आहे. १९९९ पासून रशियात पुतिनराजच आहे. बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये त्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरलेले नाहीत.

रविवारी निकालात पुतिन विजयी

शुक्रवारी सुरु झालेलं मतदान तीन दिवस चाललं. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी ८८ टक्के मतं मिळवत विजय मिळवला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं होतं. आता पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत.

reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
elon musk role in trump administration
‘लाभार्थी’ इलॉन मस्कची ट्रम्प प्रशासनात काय भूमिका राहील? त्याच्या कंपन्यांना किती आणि कसा फायदा होणार? 
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

निवडणूक निष्पक्ष नव्हती असा अमेरिकेचा आरोप

पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली होती. जी निवडणूक झाली ती निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असं अमेरिकेने म्हटलं आहे. मात्र आता पुतिन यांच्या विजयानंतर त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. या विजयामुळे पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या दोनशे वर्षात दीर्घकाळासाठी राष्ट्राध्यक्ष राहण्याचा रेकॉर्ड हा पुतिन यांच्या नावे झाला आहे.

हे पण वाचा- अमेरिकेतील निवडणुकीत ‘पुतिन फॅक्टर’? बायडेन-ट्रम्प लढतीमध्ये रशियाचा हस्तक्षेप?

रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केलं. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. व्लादिमीर पुतिन यांनी पहिलं मतदान केलं, त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. पुतिन यांच्याविरोधात शुक्रवार आणि शनिवारी अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि मतपत्रिका खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला.