रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोणत्याही युक्रेनवर हल्ला करण्याची रणनीती आखली असून त्यांच्या फौजा त्यासाठी सज्ज असल्याचा इशारा युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे प्रमुख अ‍ॅण्ड्री पॅरुबी यांनी दिला आहे. पुतिन यांचे ध्येय केवळ क्रायमियाच नसून त्यांना संपूर्ण युक्रेनच गिळंकृत करायचा आहे, असाही आरोप पॅरुबी यांनी रविवारी केला.
क्यीव्ह शहरात जमलेल्या हजारो निदर्शकांसमोर बोलताना उपरोक्त आरोप करतानाच पॅरुबी यांनी युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पुतिन यांच्या मोठय़ा फौजा सीमेवर सज्ज असल्याचा इशाराही दिला. या फौजा कोणत्याही दिवशी सरहद्द पार करून हल्ला करतील. युक्रेन हा रशियाचाच एक भाग असावा, हे पुतिन यांचे स्वप्न आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्या फौजांना युक्रेनच्या दिशेने आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताचा रशियाचे उपसंरक्षणमंत्री अ‍ॅण्टोली अ‍ॅण्टोनोव्ह यांनी मॉस्को येथे इन्कार केला. शेजारी राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका पोहोचेल, असे कोणतेही अघोषित कृत्य रशियाच्या सशस्त्र फौजा करणार नाहीत, असे अ‍ॅण्टोनोव्ह यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा