परदेशी बॅंकातील काळा पैस परत आणण्याचे वचन देणाऱया राजकीय पक्षालाच मत द्या, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केले. ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात बोलताना जेठमलानी यांनी हे आवाहन केले.
ते म्हणाले, नागरिकांनी राजकीय पक्षांकडून केवळ एकाच गोष्टीची मागणी केली पाहिजे. परदेशातील बॅंकांमध्ये ठेवण्यात आलेला काळा पैसा देशात परत आणण्याची मागणी नागरिकांनी राजकीय पक्षांकडे केली पाहिजे. राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या आश्वासनाचा उल्लेख केला पाहिजे, असे जेठमलानी म्हणाले.
देशातील गरिबांना लुटून मोठ्या उद्योगपतींनी आणि राजकारण्यांनी हा पैसा परदेशामध्ये ठेवलाय. मात्र, तो परत आणण्यासंदर्भात सरकार मूग गिळून गप्प आहे, असाही आरोप जेठमलानी यांनी केला.

Story img Loader