पीटीआय, ढाका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बांगलादेशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, दिवसभरात ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली होती.
मतदान संध्याकाळी चार वाजता संपले. मतमोजणी सुरू झाली असून सोमवारी लवकरच निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. एकूण ३०० मतदारसंघांपैकी २९९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. एका मतदारसंघात अवामी लीगच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे तिथे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.
हेही वाचा >>>“मालदीवमधील मंत्र्यांची भारतीयांबद्दल वर्णद्वेषी वक्तव्ये…”, अक्षय कुमारचा संताप; म्हणाला, “आता स्वाभिमान…”
दुपारी ३ वाजेपर्यंत २७ टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अंतिम मोजणीनंतर या आकडेवारीत सुधारणा होऊ शकते असे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबिबुल आवल यांनी सांगितले. मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. बीएनपीने बहिष्कार घातलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीग पुन्हा विजयी होऊन शेख हसीना सलग चौथ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात असा अंदाज आधीपासूनच वर्तवण्यात येत आहे.