नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येईल की २७ वर्षांनंतर भाजप राष्ट्रीय राजधानी सरकार स्थापन करेल, हे शनिवारी दुपारपर्यंत समजणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि सुरुवातीच्या तासांपासून लवकर कल येण्याची शक्यता आहे. दिल्लीत बुधवारी मतदान झाले असून ६०.५४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आपला पक्ष जवळपास ५० जागा जिंकेल, असा दावा केला, तर ‘आप’ने मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेटाळून लावले आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला.

‘एसीबी’ची केजरीवाल यांना नोटीस

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपने आपच्या १६ उमेदवारांना पक्षांतर करण्यासाठी आमिष दाखविल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आदेश दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) केजरीवाल यांच्या घरावर धडक दिली. एसीबीने केजरीवाल यांना आरोपांबाबत तपशील आणि पुरावे मागवून कायदेशीर नोटीस बजावली आहे.