तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या राधाकृष्णननगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीच्या रिंगणात असून शनिवारी या मतदारसंघात ७४ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले. दरम्यान, केरळमधील अरुविक्कारा मतदारसंघात भर पावसातही ७४.४ टक्के इतके मतदान झाल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय सशस्त्र दल आणि राज्य पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान झाले, त्यावेळी मतदारांनी लांबलचक रांगा लावल्या होत्या. भाकपचे सी. महेंद्रन आणि सामाजिक कार्यकर्ते  ‘ट्राफिक’ रामास्वामी हे प्रमुख उमेदवार जयललिता यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आणि माकपप्रणीत एलडीएफ यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर झालेल्या मतदानाचा लाभ आम्हालाच होणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तामीळनाडूच्या राधाकृष्णनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शनिवारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आणण्यात आले.

तामीळनाडूच्या राधाकृष्णनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शनिवारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आणण्यात आले.