नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार असून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून उन्हाच्या तडाख्यामुळे तुलनेत कमी मतदान झाल्याचे मानले गेले. त्यानंतर आयोगाकडून वाढत्या तापमानासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. तापमान नियमित श्रेणीमध्ये राहणाचा अंदाज असल्याने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर सोयीसुविधांसह उष्णतेपासून बचावासाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?

हेही वाचा >>>ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

‘बसप’ उमेदवाराच्या मृत्यूमुळे मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान घेतले जाईल. उर्वरित पाच टप्प्यांतील मतदान १ जूनपर्यंत होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

विविध सोयीसुविधा, सुरेक्षेचा आढावा

’ १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांसाठी (खुल्या जागा- ७३, अनुसूचित जातींसाठी राखीव- ६, अनुसूचित जमातींसाठी राखीव- ९) मतदान होईल.

’ मतदान सकाळी ७ वाजता सुरू होईल.  

’ उष्ण हवामानात मतदारांच्या सोयीसाठी बिहारमधील बांका, मधेपुरा, खगरिया आणि मुंगेर मतदारसंघांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संध्या. ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

’ १६ लाखांहून अधिक मतदान अधिकारी १.६७ लाख मतदान केंद्रांवर तैनात असतील.

’ एकूण १५.८८ कोटी पात्र मतदार मतदान करू शकतील.

’ मतदारांमध्ये ८.०८ कोटी पुरुष, ७.८ कोटी महिला व ५,९२९ तृतीयपंथीय आहेत.

’ ४३.८ लाख नवे मतदार आहेत. २०-२९ वयोगटातील ३.२८ कोटी तरुण-तरुणी मतदार आहेत.

’ १२०२ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये पुरुष- १०९८, तर महिला- १०२ व तृतीयपंथी उमेदवार २ आहेत.

’ ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील १४.७८ लाख मतदार असून वयाची शंभरी पार केलेले ४२ हजार २२६ मतदार आहेत. १४.७ लाख अपंग मतदार आहेत. या मतदारांना घरातून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

’ सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी ३ हेलिकॉप्टर, ४ विशेष गाडय़ा आणि सुमारे ८० हजार वाहने तैनात करण्यात आली आहेत.

’  सर्व मतदान केंद्रांवर निरीक्षकांच्या तैनातीसह ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर म्हणजे वेबकािस्टग केले जाईल. १ लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकािस्टग केले जात आहे.

’ २५१ निरीक्षक (८९ सामान्य निरीक्षक, ५३ पोलीस निरीक्षक, १०९ वित्तविषयक निरीक्षक) मतदानाच्या काही दिवस आधीच मतदारसंघांत पोहोचले आहेत. काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

’ एकूण ४ हजार ५५३ फ्लाइंग स्क्वॉड्स, ५ हजार ७३१ स्टॅटिक सव्‍‌र्हिलन्स टीम्स, १ हजार ४६२ व्हिडीओ सव्‍‌र्हिलन्स टीम्स आणि ८४४ व्हिडीओ व्ह्यूइंग टीम देखरेख ठेवतील.

’ एकूण १ हजार २३७ आंतरराज्यीय व २६३ आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाक्यांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तू आदींच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर असेल. सागरी आणि हवाई मार्गावर कडक पाळत ठेवण्यात आली आहे.

’ ८८ मतदारसंघांमधील ४ हजार १९५ प्रारूप मतदान केंद्रे उभी केली आहेत. ४ हजार १०० हून अधिक मतदान केंद्रांची जबाबदारी पूर्णपणे महिलांकडे सोपवण्यात आली आहे. या केंद्रांवर महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

’ बिहार आणि केरळ वगळता सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजारपेक्षा कमी मतदार आहेत. बिहारमध्ये १ हजार ८ व केरळमध्ये प्रति मतदान केंद्र १ हजार १०२ मतदार आहेत.

Story img Loader