Wagner Group Chief Yevgeny Prigozhin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवणारे आणि नंतर हे बंड मागे घेणारे येवजेनी प्रिगोझिन यांची हत्या झाल्याची चर्चा आहे. ही चर्चा होते आहे कारण अमेरिकीचे माजी जनरल रॉबर्ट अब्राम्स यांनी हा दावा केला आहे की प्रिगोझिन यांची हत्या करण्यात आली आहे किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. अब्राम्स यांनी हा संशय व्यक्त केला आहे की मी प्रिगोझिन यांना बंड शमल्यानंतर सार्वजनिक व्यासपीठावर पाहिलेलं नाही. मला वाटतं आहे की एक तर त्यांना लपवण्यात आलं आहे, तुरुंगात डांबण्यात आलं आहे किंवा अन्य प्रकारे दूर करण्यात आलं आहे. त्यांनी हा दावा केल्याने प्रिगोझिन यांची हत्या झाली आहे का? ही चर्चा सुरु झाली आहे.
प्रिगोझिन जिवंत आहेत का?
प्रिगोझिन जिवंत आहेत का हा प्रश्न विचारला असता माजी जनरल अब्राम्स यांनी म्हटलं आहे की मला व्यक्तीगत पातळीवर हे वाटत नाही की ते जिवंत आहेत. जर ते जिवंत असतील तर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं असणार. या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाकडून हे सांगण्यात आलं की प्रिगोझिन आणि त्यांच्या टीमने व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली आणि सशस्त्र बंडाला पाच दिवस झाल्यानंतर ते मागे घेतलं आणि सरकारशी एकनिष्ठ राहू असं वचन दिलं.
हे पण वाचा- पुतिन यांना आव्हान देणाऱ्या येवजेनी प्रिगोझिन आणि वॅग्नरच्या योद्ध्यांचे पुढे काय होणार?
जनरल पुढे काय म्हणाले?
जनरल पुढे म्हणाले मला असे वाटते की आता इतर कोणीही प्रिगोझिनला कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर पाहू शकणार नाही. ते कोणत्याही तुरुंगातही नाही. मला वाटते की ते आता जिवंत नाहीत. तसे असेल तर रशियन सरकारने काही पुरावे द्यावेत. पुतिन आणि प्रिगोझिन २९ जूनला भेटले तर, व्हिडिओ किंवा फोटो का समोर आले नाहीत? रशियन सरकारचे प्रवक्तेही खोटे बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ यांनीही अशीच शंका व्यक्त केली होती. ते म्हणाले होते – पुतिन त्यांच्या विरोधकांना आणि विशेषतः अशा विरोधकांना कधीही माफ करू शकत नाहीत. Republic ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
२७ जून च्या सकाळी प्रिगोझिन यांचा सर्वात ताजा फोटो बाहेर आला. प्रिगोझिन एका गाडीत बसून रोस्तोव्ह शहराच्या बाहेर जात असून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्यही दिसत आहे. रोस्तोव्ह शहरावर वॅग्नर सैन्यांनी ताबा मिळवल्याचा दावा प्रिगोझिन यांनी केला होता. रोस्तोव्ह येथून प्रिगोझिन बेलारूसमध्ये जातील, अशी शक्यता वर्तविली गेली. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे पुतिन यांचे निष्ठावान मानले जातात. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे बंड शमल्याचे सांगितले जाते.
हे पण वाचा- “रशियातल्या नागरिकांनी एकमेकांचा जीव घ्यावा हीच पाश्चिमात्य देशांची….” बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच बोलले पुतिन
२४ जून रोजी काय झालं होतं?
२४ जून रोजी वॅगनर ग्रुपने रशियाविरुद्ध बंडाची घोषणा केली. वॅग्नरचे सैन्य युक्रेनमधील छावणी सोडून रशियन सीमेत घुसले होते. त्याने रोस्तोव्ह शहर आणि लष्करी मुख्यालय ताब्यात घेतले. तेव्हा प्रिगोझिन म्हणाले होते – आम्ही मरण्यास घाबरत नाही. आम्ही रशियन सैन्याची अनेक हेलिकॉप्टर खाली पाडली. रशियाच्या मीडिया हाऊसनुसार RT- प्रीगोझिन यांनी रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना रोस्तोव येथे येऊन भेटण्यास सांगितले होते. रशियाचे संरक्षण मंत्री आणि प्रिगोझिन यांचे संबंध कधीच चांगले राहिले नाहीत.