रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच निर्माण केलेल्या वॅग्नर या सत्ताबाह्य खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे. या लष्करी संघटनेचा वापर देशाबाहेरच्या दहशतवादी कारवायांसाठी केला जायचा. विशेष म्हणजे या वॅग्नर लष्कराचा युक्रेन युद्धामध्येही वापर झाला. मात्र, हे युद्ध लांबले आणि त्यात वॅग्नरचं मोठं नुकसान झालं. यानंतर आता या खासगी लष्कराने पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी केली. तसेच पुतिन यांनी चुकीचा मार्ग अवलंबला, आता लवकरच रशियाला एक नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुतिन यांनी बंडखोर खासगी लष्कराला संपवण्याची शपथ घेतल्यानंतर आता वॅग्नर लष्कराचा प्रमुख येवगिनी ग्रिगोझीनने पुतिन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याचं म्हटलं आहे. तसेच लवकरच रशियाच्या जनतेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळतील, असे सुतोवाच केले. वॅग्नर लष्कराने रशियाच्या दोन शहरांवर आपलं नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. याशिवाय वॅग्नरने रशियन सैन्याचे तीन हेलिकॉप्टर पाडल्याचाही दावा केला आहे.

“दहशतवादी मार्गाने सशस्त्र बंड”

दरम्यान, वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर लष्करावर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “रशियात जे घडत आहे ती गद्दारी आहे. व्यक्तिगत महत्त्वकांक्षेमुळे देशद्रोह करण्यात आला आहे, असाही आरोप पुतिन यांनी केला आहे.ज्यांनी जाणीवपूर्वक दहशतवादी मार्गाने सशस्त्र बंड केला आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल.”

हेही वाचा : VIDEO: “खासगी लष्कर बाळगणाऱ्या राज्यकर्त्यांवर ‘ही’च वेळ येते”, रशियातील बंडखोरीवर गिरीश कुबेर यांचं विश्लेषण…

दरम्यान, युक्रेन युद्धात वॅग्नर खासगी लष्कराचे मोठे नुकसान झाले. त्याची जबाबदारी घेणे पुतिन यांनी टाळले आणि म्हणून ही बंडखोरी झाली. आता त्याचे रशियावर दूरगामी परिणाम होतील असं जाणकार सांगत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wagner chief warn vladimir putin after armed rebellion in russia
Show comments