Lebanon Walkie-Talkies Explode : लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी (१७ सप्टेंबर) समोर आली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हेझबोलाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले होते. यानंतर आता आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, पेजर बॉम्बस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तब्बल २८०० लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्यामुळे लेबनॉन हादरलं आहे. दरम्यान, आज झालेल्या स्फोटाच्या घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हेझबोलाहच्या पेजर स्फोटात मृत्यू झालेल्या लोकांचे अंतिम संस्कार केले जात होते. त्या ठिकाणीही स्फोट झाला. पेजर स्फोटांमुळे लेबनॉनमधील हजारो सदस्य जखमी झाले आहेत.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
Viral Video
Kanpur Viral Video : चोरट्याने देवाला आधी जल अर्पण केलं अन् मग चोरला कलश; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हेही वाचा : Lebanon Pager Blast : इस्रायलच्या मोसादने साध्या पेजरचं विध्वंसक अस्त्रात कसं केलं रुपांतर? हेझबोलाचे धाबे दणाणले

सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने एका वृत्तात म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं की, हॅन्डहेल्ड रेडिओ किंवा वॉकी-टॉकी हेझबोलाहने सुमारे पाच महिन्यांपूर्वी खरेदी केले होते आणि त्याच वेळी पेजर देखील खरेदी केले होते. आज वॉकी टॉकीचा स्फोट होऊन ३०० जण जखमी आणि ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वॉकीटॉकीमधील स्फोटाचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. पेजर्सप्रमाणे ही उपकरणेही पाच महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.

पेजर-स्फोटांमुळे उडाली मोठी खळबळ

लेबनीज नागरिकांकडील जवळपास १००० पेजर्सचा स्फोट झाला मंगळवारी झाल्याचे वृत्त समोर आले होते. जवळपास तासभर विविध ठिकाणी – भाजी बाजारांत, दुकानांमध्ये, कार्यालयांत, काही प्रसंगी मोटारीत किंवा बाइक चालकांच्या खिशात स्फोट झाल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. प्रामुख्याने राजधानी बैरूट आणि इस्रायल-लेबनॉन सीमाभागातील शहरांमध्ये स्फोट झालेले आहेत. सीमा भागामध्ये हेझबोलाचे प्राबल्य आहे. हेझबोला आणि इराण समर्थित इतर संघटनांना धडा शिकवण्याचा इशारा इस्रायलने आदल्याच दिवशी दिला होता.

पेजरमध्ये स्फोट झालेच कसे?

हे बहुतेक पेजर हेझबोलाने तस्करी करून लेबनॉनमध्ये आणले होते. पेजरमधील लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण अशा प्रकारे सदोष पेजरही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही कसे होऊ शकतात, हे कोडे उलगडलेले नाही. लिथियम हे बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट होत नाही म्हणून लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही पद्धतशीरपणे ज्या प्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार असू शकतो का, याविषयी सामरिक आणि तंत्र विश्लेषक गोंधळलेले आहेत.