Waqf Amendment Bill 2024 Passed in Loksabha Hightlights: वक्फ (सुधारणा) विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाली आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ खासदारांनी मतदान केले. लोकसभेत वक्फ विधेयकावर वादळी चर्चा झाल्यानंतर आज राज्यसभेतही वक्फवर भाषणे होणार आहेत. विरोधकांनी हे विधेयक संविधानविरोधी असल्याचे सांगितले तर सत्ताधाऱ्यांनी या विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना लाभ मिळणार असल्याचे म्हटले.
राज्यसभेत एनडीएकडे १२५ खासदारांचे संख्याबळ आहे. तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडे ९५ खासदारांचे पाठबळ आहे. तर भारत राष्ट्र समिती ४, बिजू जनता दल ७, अण्णाद्रमुक ४ आणि बसपाचा १ असे १६ खासदार इतर पक्षातून येतात. लोकसभे प्रमाणेच राज्यसभेतही एनडीएकडे बहुमत आहे.
Lok Sabha Waqf Bill Rajyasabha Live Updates | वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभा लाईव्ह अपडेट्स
Rajyasabha Live Updates: मुस्लीम देशांनीही वक्फ कायदा बदलाल, मग आपण का नाही? जेपी नड्डांचा सवाल
राज्यसभेचे सभागृह नेते जेपी नड्डा यांनी वक्फ बिलाच्या समर्थनार्थ बोलत असताना सांगितले की, मुस्लीम देशांनीही वक्फ कायद्यात दुरूस्ती केली आहे. त्यांनी वक्फच्या मालमत्ता पारदर्शक आणि डिजिटल केल्या आहेत. मग भारताने का नाही करायचे?
Waqf Amendment Bill Live Updates: ‘वक्फ’वर बोलताना ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर वर्गणीवरून भाजपाला म्हटले ‘चोर’
राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपाच्या नेत्यांनी राम मंदिराच्या नावावर वर्गणी मागितली आणि त्यात घोटाळा केला, असा आरोप केला. भाजपाच्या खासदारांना त्यांनी ‘चंदा चोर’ असे संबोधल्यानंतर सभागृहात गदारोळ उडाला. यानंतर सभापतींनी संजय सिंह यांचे आक्षेपार्ह विधान कामकाजातून काढून टाकले.
Waqf Amendment Bill Live Updates: लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर वक्फ विधेयक राज्यसभेत सादर; वादळी चर्चा सुरू
अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे विधेयक सादर केले आहे. या कायद्याचे नाव बदलून उम्मीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) विधेयक असे ठेवले गेल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर आता विरोधी सदस्यांकडून वादळी चर्चा सुरू आहे.
Waqf Amendment Bill Passed : नेमक्या कोणत्या तरतुदींसह वक्फ विधेयक लोकसभेत झालं मंजूर? वाचा महत्त्वाचे मुद्दे
काल दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत. नव्या विधेयकात झालेले बदल काय आहेत? वाचा
वक्फ बोर्डाकडे भारतातील ३९ लाख एकर जमीन आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.