Parliament Budget Session 2025 Updates: वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे. त्यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी आठ तास देण्यात आले आहेत. ही चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला ‘एनडीए’तील नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त), तेलुगु देसम आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. या तीनही पक्षांनी विधेयकाच्या समर्थनार्थ पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Live Updates

Lok Sabha Waqf Bill Live Updates | वक्फ सुधारणा विधेयक लोकसभा अपडेट्स

 

18:30 (IST) 2 Apr 2025

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान ‘जनाब राहुल गांधी, मोहतरमा प्रियांका गांधी’ गैरहजर, वंचितची खोचक टीका

वक्फ (सुधारणा) विधेयकावर लोकसभेत चर्चा होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी संसदेत अनुपस्थित असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ज्यांनी मोहब्बत की दुकान उघडली होती, ते आज द्वेषाच्या विरोधात उभे राहण्यासाठी का घाबरत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

18:25 (IST) 2 Apr 2025

वक्फ बोर्ड व्यवस्थापनात बिगर मुस्लिमांना प्रवेश नाही: अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत बोलताना आश्वासन दिले की, वक्फ बोर्ड व्यवस्थापनात कोणत्याही बिगर मुस्लिमांना प्रवेश दिला जाणार नाही.

18:20 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटावर श्रीकांत शिंदेंची टीका, म्हणाले, “बुलडोझरने…”

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान ठाकरे गटाने याला विरोध केल्याने टीका केली आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, “शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने, मी या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा देतो. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम ३७०, नंतर तिहेरी तलाक व सीएए आणि आता हे विधेयक गरिबांच्या कल्याणासाठी या सभागृहात आणले गेले आहे. त्यांचे (अरविंद सावंत, ठाकरे गट) भाषण ऐकून मला खूप वाईट वाटले. ते खूप धक्कादायक होते.”

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill: “त्यांनी मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या”, लोकसभेत वक्फ विधेयक सादर होताच भाजपाच्या नेत्याची टीका

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले “आम्ही वक्फ दुरूस्ती विधेयकाचे स्वागत करतो कारण यामुळे आता शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळतील. हे एक अतिशय प्रतिष्ठित विधेयक आहे. मी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा आणि सर्व भाजप नेत्यांचे कौतुक करतो कारण हे कर्नाटकसाठी खूप आवश्यक आहे.”

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले “आम्ही वक्फ दुरूस्ती विधेयकाचे स्वागत करतो कारण यामुळे आता शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळतील. हे एक अतिशय प्रतिष्ठित विधेयक आहे. मी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा आणि सर्व भाजप नेत्यांचे कौतुक करतो कारण हे कर्नाटकसाठी खूप आवश्यक आहे.”

मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी…

ते पुढे म्हणाले की, “वक्फ मुद्द्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यांनी मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आहेत. वक्फ बोर्डात खूप पैशांचा गैरवापर झाला आणि लाखो एकरपेक्षा जास्त जमीनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. हे देखील बेकायदेशीर आहे. म्हणूनच हे विधेयक स्वागतार्ह आहे.”

17:01 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill Live Updates: शिवसेनेच्या खासदारांनी भाषण तर केले, पण विरोध की पाठिंबा याबाबत संभ्रम कायम; मंत्र्यांचा टोला

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी वक्फ विधेयकात कशा चुका आहेत, याबाबत जोरदार भाषण लोकसभेत केले. मात्र त्यांनी या विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध? याबाबत काही स्पष्टता दिली नाही, असा मुद्दा अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला. अरविंद सावंत यांच्या भाषणानंतर किरेन रिजिजू उभे राहिले आणि त्यांनी या विधेयकावर तुमचे मत काय ते सांगा? असे आवाहन केले.

16:40 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill Live Updates: ‘काश्मीरमध्ये किती हिंदूंनी जमिनी घेतल्या’, कलम ३७० वर अरविंद सावंत यांची टीका

केंद्र सरकारने कलम ३७० हटवले, तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन व्यक्त केले होते. मात्र कलम ३७० हटविल्यानंतर किती हिंदूंनी तिथे जमिनी घेतल्या, याची माहिती सरकारने द्यायला हवी, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी केली.

16:22 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill Live Updates: “उद्या हिंदूंच्या मंदिरावर गैरहिंदू प्रतिनिधी आला तर…”, शिवसेना खासदार अरविंद सावंतांचा सवाल

वक्फ (सुधारणा) विधेयकात वक्फ बोर्डाच्या समितीवर बिगर मुस्लीम व्यक्तींना घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या जर हिंदू देवस्थानच्या समितीवर गैर हिंदू व्यक्तीला घेतले तर काय? असा सवाल शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच हिंदूंच्या मंदिरावर बिगर हिंदूंची नियुक्ती केल्यास त्याचा आम्ही विरोध करू, असेही ते म्हणाले.

15:15 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: ‘ईदची नमाज करू न देणारे लोक मुस्लिमांच्या हक्काबाबत बोलतायत’, गौरव गोगोई

वक्फ विधेयकात सुधारणा केल्यामुळे गरीब मुस्लिमांना लाभ होणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र या दावा फोल असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला. ते म्हणाले, भाजपाचे डबल इंजिन असलेल्या राज्य सरकारांनी ईदच्या दिवशी मुस्लिमांना रस्त्यावर नमाज पठन करण्यास विरोध केला. भाजपाकडे किती मुस्लीम खासदार आहेत, हे त्यांनी एकदा सांगावे.

https://twitter.com/AHindinews/status/1907367640953471485

15:01 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: वक्फच्या चर्चेदरम्यान अखिलेश यादव आणि अमित शाह यांच्यात जुंपली; पण संसदेत झाला हास्यकल्लोळ

भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगतो, तरीही त्यांना स्वतःचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप निवडता येत नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हसत हसत उत्तर दिले. ते म्हणाले, अखिलेश यांनी हसत हसत प्रश्न उपस्थित केला. म्हणून मीही तसेच उत्तर देतो. आमच्या पक्षाचे १२ ते १३ कोटी सदस्य असल्यामुळे सर्वांचा विचार घेऊन निर्णय घ्यावा लागतो. काही पक्षात एकाच कुटुंबातील पाच सदस्य बसून निर्णय घेतात. तर तुमच्या पक्षात तुम्हीच निर्णय घेता. तुम्ही पुढचे २५ वर्ष अध्यक्ष असाल, असे मी आताच सांगतो.

https://twitter.com/ians_india/status/1907355083551175036

13:40 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: ज्या समाजाने स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, त्या समाजाला नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे

ज्या समाजाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, ज्यांनी १८५७ च्या उठावात सक्रिय सहभाग घेतला, ज्यांनी भारत छोडो चळवळीत सहभाग घेतला, त्या समाजावर सत्ताधारी नख लावण्याचा प्रयत्न वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून करत आहेत, असा आरोप काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केला.

13:30 (IST) 2 Apr 2025
Lok Sabha Waqf Bill Live Updates : आज मुस्लीम उद्या दुसऱ्या धर्माच्या जमिनींवर यांची नजर जाईल – काँग्रेस खासदाराचा आरोप

आज एका विशिष्ट धर्माच्या जमिनीवर यांची (सत्ताधारी) नजर गेली आहे. उद्या दुसऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या जमिनीवर नजर जाईल, असा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आपल्या भाषणात केला.

13:23 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates : ‘मोदी सरकार नसते आले तर संसदेची इमारतही वक्फने घेतली असती’ – किरेन रिजिजू

दिल्लीमध्ये १९७० पासून एक खटला सुरू आहे. दिल्ली वक्फ बोर्डाने दिल्लीतील अेक सरकारी मालमत्तांवर दावा ठोकला होता. तत्कालीन यूपीए सरकारने वक्फ बोर्डाला दिल्लीतील १२३ संपत्ती देऊन टाकल्या होत्या. जर मोदी सरकार आले नसते तर कदाचित संसदेची इमारत असलेली जागाही वक्फ बोर्डाकडे गेली असती.

12:59 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill Live Updates: ‘वक्फ मालमत्तेचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हावा’ – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

देशभरात वक्फशी निगडित ३० हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता, असेही ते म्हणाले.

12:52 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: ‘देशात अशांततेचे वातावरण’, काँग्रेस खासदाराने व्यक्त केली भीती

संयुक्त संसदीय समितीकडे वक्फ विधेयक पाठविल्यानंतर तिथेच त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशी चर्चा होऊ दिली नाही. अल्पसंख्याक समुदायाबाबत सरकार असा कायदा आणत आहे, ज्यामुळे देशात अशांततेचे वातावरण तयार होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी दिली.

12:49 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: वक्फ कायद्यात ब्रिटिश काळापासून बदल होत आले – किरेन रिजिजू

वक्फशी निगडित मालमत्तांचे नियमन करण्यासाठी हा पहिल्यांदा बदल होत नाही आहे. ब्रिटिश काळापासून वक्फशी निगडित मालमत्तांबाबत कायदे होत आले आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

12:41 (IST) 2 Apr 2025
Lok Sabha Waqf Bill Live Updates: “वक्फ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हे केवळ..”, किरेन रिजिजू यांची स्पष्टोक्ती

वक्फ (सुधारणा) विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. वक्फ बोर्डाच्या प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या मालमत्ता नियंत्रित केल्या जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

12:23 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill Live Updates: वक्फ विधेयक लोकसभेत सादर; अमित शाह म्हणाले, “हा काँग्रेसचा काळ नाही..”

वक्फ विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्षाच्या वतीने विधेयकाविरोधात पॉईंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मंत्रिमंडळाने संमती दिल्यानंतर सभागृहात विधेयक मांडले गेले. सभागृहाने संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार समितीकडे विधेयक पाठवले. समितीने दिलेल्या शिफारशींना मान्यता दिली आणि त्यानंतर आता पुन्हा विधेयक मांडले जात आहे. हे सर्व संसदीय मार्गाने होत आहे. हा काही काँग्रेसचा काळ नाही. त्यांच्या काळात समित्या केवळ शिक्का मारत होत्या. आम्ही स्थापन केलेल्या समितीने स्वतःचा विचार मांडला आहे.

11:57 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: “वक्फला अमर्यादित अधिकार…”, ज्ञानव्यापीचा खटला लढविणाऱ्या वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू

ज्ञानव्यापी आणि संभल मशिदीच्या विरोधात न्यायालयीन खटला चालविणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की, वक्फला अमर्यादित अधिकार दिले होते. या विधेयकाच्या माध्यमातून वक्फच्या व्याख्येत बदल करण्यात येत आहे. तसेच वक्फच्या समितीमध्ये इस्लामचे ज्ञान असणाऱ्यांना घेतले जाणार आहे. यात अनेक बदल केले असले तरी आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. पुढील काळात ती होईल.

11:28 (IST) 2 Apr 2025

What is Waqf Board: वक्फ शब्दाचा अर्थ काय? वक्फ बोर्ड नेमकं काय काम करतं?

What is meaning of Waqf: लोकसभेत आज वक्फ (सुधारणा) विधेयक मांडले जाणार आहे. यानिमित्त वक्फ या शब्दाचा नेमका अर्थ काय? वक्फ बोर्डाचे नेमके काम काय? हे इथे जाणून घ्या

11:22 (IST) 2 Apr 2025

Lok Sabha Waqf Bill Live Updates: “मुस्लीमांची जमीन हडपण्यासाठीच…”, अबू आझमींची सरकारवर जोरदार टीका

मुस्लीमांची जमीन हडपण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणले जात आहे. आज विधेयक मंजूर झाले तर हा दिवस काळा दिवस म्हणून संबोधला जाईल. लोकांनी पुण्य कमविण्यासाठी आपल्या जमिनी वक्फला दान केल्या होत्या, ही सरकारची मालमत्ता नाही. मी ५४३ खासदारांनी विनंती करतो की त्यांनी या विधेयकाचा विरोध करावा.

10:04 (IST) 2 Apr 2025

Waqf amendment Bill: वक्फ विधेयक ही मुस्लीम समाजासाठी सर्वात मोठी ‘ईदी’, भाजपाच्या मुस्लीम नेत्याचं विधान

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे नेते मोहसीन रझा यांनी एएनआयशी बोलताना वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, या विधेयकामुळे मुस्लीम समुदायातील गरीब, वंचितांचे कल्याण होईल. ज्याप्रमाणे तिहेरी तलाक बंद करून मुस्लीम महिलांना दिलासा मिळाला. त्याप्रमाणेच वक्फ विधेयकाचाही लाभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुस्लीम समुदायाला दिलेली ही सर्वात मोठी ईदी आहे.

09:59 (IST) 2 Apr 2025
वक्फ विधेयकाला तेलुगु देसमचा पाठिंबा, अट फक्त एकच; बिगर मुस्लीम सदस्याबाबत चंद्राबाबूंची वेगळी भूमिका!
Waqf Amendment Bill in Loksabha: वक्फ सुधारणा विधेयकाला तेलुगू देसम पक्षानं पाठिंबा दिला असून त्यासाठी एक अट ठेवली आहे. …Read More
09:51 (IST) 2 Apr 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकावरून अजमेर दर्गा खादिम समितीमध्ये मतभेद, सलमान चिश्तींच्या भूमिकेवर सहकाऱ्यांची टीका
Ajmer Dargah Khadims Committee : अजमेर शरीफ दर्ग्यातील खादिमांचं (सेवक) प्रतिनिधित्व करणारी प्रमुख संस्धा ‘अंजुमन’ने वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. …Read More
08:42 (IST) 2 Apr 2025

Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. इंडिया आघाडी या विधेयकाला विरोध करणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षही इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे त्यांची याबाबत नेमकी भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला (ठाकरे) डिवचले आहे. एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले, “बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?”

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1907048403508269507

वक्फ आज लोकसभेत, विधेयकावर वादळी चर्चेची चिन्हे; रालोआतील पक्षांचा पाठिंबा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता