मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठ्या शहराला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. या शहरामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय. पाण्याचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) असं असतानाच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे युद्ध आम्ही केलेल्या नियोजित प्लॅनप्रमाणेच लढलं जात असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

“युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई नियोजनानुसार सुरु आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच कारवाई होत आहे. आतापर्यंत ठरवलेल्या सर्व गोष्टी हव्या तशाच पार पडल्यात,” असं पुतिन यांनी सुरक्षा परिषदेच्या भाषणादरम्यान म्हटलं. हे भाषण राष्ट्रीय टीव्हीवरुन प्रसारित करण्यात आलं. हा महत्वाच्या शहराला ताब्यात घेण्यासाठी रशियाकडून पाणीपुरवठा बंद करण्याबरोबरच वीजपुरवठाही बंद करण्यात आलाय. विशेष म्हणजे एकीकडे मूलभूत सेवा खंडित करण्यासोबतच दुसरीकडे सातत्याने या शहरावर हवाई हल्ले रशियाकडून केले जात आहेत.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

नक्की वाचा >> Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?

रशियन सैन्याकडून मारिउपोला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून पाण्याचा पुरवठाही रोखण्यात आलाय. तसेच शहरावर सातत्याने बॉम्ब वर्षाव होत असल्याने स्थानिकांना शहर सोडता येत नाहीय, असं युक्रेनमधील स्थानिक प्रशासनाने म्हटलंय.

युक्रेनवर हल्ला करुन एक आठवड्याचा कालावधी झालाय. मारिउपोलवर सुरु असणाऱ्या हल्ल्यांची तुलना येथील स्थानिक प्रशासनाने आणि महापौरांनी नाझीच्या काळात झालेल्या हल्ल्यांशी केलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठय़ा शहराला रशियन फौजांनी घेरले असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. खेरसन या दुसऱ्या महत्त्वाच्या बंदरातील परिस्थती अद्याप अस्पष्ट आहे. सुमारे ३ लाख लोकवस्तीचे शहर असलेल्या खेरसनवर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियन फौजांनी केला आहे. रशियन आक्रमणाला बळी पडणारे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे शहर असावे. याशिवाय लिसा होरा जिल्ह्यातील एका प्रक्षेपण केंद्रावर हल्ला चढवल्याचा दावाही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी एका दृश्यफीत भाषणात युक्रेनच्या नागरिकांना प्रतिकार सुरू ठेवण्याचे आवाहन केले. आक्रमण करणाऱ्यांना एक क्षणही शांतता लाभू न देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रशियाने युक्रेनमधून बाहेर पडावे या मागणीसाठी जगातील बहुतांश देश संयुक्त राष्ट्रांमध्ये एकत्र आल्याने रशिया आणखी एकटा पडला आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टातील प्रॉसिक्युटरने संभाव्य युद्ध गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

या युद्धात रशियाने प्रथमच त्याच्या लष्करी हानीची माहिती देताना, आपले ५०० सैनिक ठार व सुमारे १६०० सैनिक जखमी झाल्याचे सांगितले आहे. युक्रेनने त्याच्या सैन्याचे नुकसान अद्याप जाहीर केले नाही. रशियाने युद्धात त्याचे जवळपास ९ हजार सैनिक गमावल्याचे युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.