“सीमेपलीकडील लष्कर आणि राजकीय नेतृत्वाच्या भडकवणा-या वक्तव्यांमुळे तणाव आणखी वाढवण्यापेक्षा दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेसंबंधित सर्व मुद्यांवर  चर्चा करायला हवी. शक्य असल्यास ही चर्चा परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर झाल्यास त्यातून समाधानकारक पर्याय निघू शकतात”, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खान म्हणाल्या. पाकिस्तानने नियंत्रण रेषेशी निगडीत सर्व कारणांना आणि नऊ वर्ष जुन्या संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी भारतासोबत चर्चेचा हात पुढे केला आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी आज (गुरूवार) आपले भारतीय समकक्ष सलमान खुर्शीद यांच्याशी या संबंधी चर्चेचा प्रस्ताव ठेवला. संघर्ष विराम २००३ पासून अमलात आहे.
त्यांनी काल (बुधवार) केलेल्या एका वक्तव्यामध्ये म्हटले, आरोप-प्रत्यारोपामुळे तणाव वाढून त्याचे निश्चितपणाने दुष्परिणाम होतात.
मागील दहा दिवसांमध्ये संघर्ष विरामाचे सतत उल्लंघन झाल्याने नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती आहे. संघर्षविरामाच्या उल्लंघनामुळे भारताचे दौन आणि पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले आहेत.
पाकिस्तानी लष्कराने केलेल्य़ा वक्तव्यात म्हटले आहे की, दोन्ही पक्षांच्य़ा सैन्य अभियान महानिर्देशकांनी फओनवर चर्चा केली आणि नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यावर सहमती दर्शविली.  
हिना रब्बानी यांनी म्हटले, ‘‘पाकिस्तान आणि भारत दक्षिण एशियातील महत्वपूर्ण देश आहेत. त्यांनी सर्व समस्यांचे निवारण करून अतिशय जबाबदारीने शांतीचा संदेश दिला पाहिजे.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेत्यांकडून सतत झालेल्या नकारात्मक वक्तव्यांमुळे पाकिस्तान निराश झाला आहे. इस्लामाबादने आपल्या सार्वजनिक वक्तव्यांवर संतुलन आणि जाणूनबुजून संयम ठेवला आहे. हे सर्व क्षेत्राची शांतीला लक्षात घेऊन केले गेले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले, ‘‘आम्ही चर्चेच्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि पूर्ण उर्जेनिशी या स्रव प्रक्रियेला रचनात्मक पध्दतीने पुढे नेले जाईल. भारतासोबत रचनात्मक संबंध वाढवण्यासाठी पाकिस्तानने खूप पुढची पावले उचलली आहेत.

Story img Loader