भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत. मोदी यांनी आज (९ जुलै) त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी यांनी यावेळी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी मोठा धोका आहे. यासह मोदी यांनी करोना काळात भारत व रशियाने केलेल्या पेट्रोल-डिझेल कराराचं कौतुक केलं. यावेळी पुतिन यांनी मोदी यांना कझान ब्रिक्स परिषदेचं आमंत्रण दिलं. ही शिखर परिषद २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान, रशियामधील कझान शहरात आयोजित करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी जगाला शांतीचा संदेश देत म्हणाले, युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत, कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत. शांततेसाठी चर्चेची खूप जास्त गरज असते. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. कारण युद्ध हा अडचणींवरील उपाय नाही. मला शांततेची अपेक्षा आहे. मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे.

“सिर पर लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी’

नरेंद्र मोदी म्हणाले, भारत रशियाचा विश्वासू मित्र आहे. आमचे रशियातील मित्र त्याला दुधवा म्हणतात. आम्ही त्याला मैत्री म्हणतो. रशियात हिवाळ्यात तापमान शून्य अंशाच्या कितीही खाली गेलं तरी आमच्या मैत्रीतली उब कायम असते. आमचं नातं परस्पर आदरावर टिकून आहे. आमच्याकडे (भारतात) प्रत्येक घरात एक गाणं गायलं जातं. ‘सिर पर लाल टोपी सुरू, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी’. हे गाणं आता खूप जुनं झालंय. मात्र आमची भावना अजूनही तीच आहे. भारत आणि रशियाची मैत्री चित्रपटांनी आणखी पुढे नेली आहे. आमच्या मैत्रीची वारंवार परीक्षा घेतली गेली. मात्र आम्ही प्रत्येक आव्हानावर मात केली.

हे ही वाचा >> दलाई लामांनी लहान मुलाला किस केल्याचं प्रकरण, POCSO अंतर्गत कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली

या द्विपक्षीय चर्चेआधी मोदी यांनी मॉस्को येथील एका कार्यक्रमात तिथल्या भारतीयाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी इथे येताना एकटा आलेलो नाही. मी माझ्याबरोबर काही गोष्टी घेऊन आलोय. मी माझ्याबरोबर भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय, तुमच्यासाठी १४० कोटी भारतीयांचं प्रेम घेऊन आलोय. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिलाच संवाद आहे. हा खूप आंनदायी क्षण आहे. आज ९ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे. मी आज तुम्हा सर्वांसमोर ठामपणे सांगेन की, माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन. आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन. देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War wont solve problems we will take initiative for peace narendra modi advises vladimir putin russia ukraine conflict asc