२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. त्यातच सुकेश चंद्रशेखरने एक मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखरने केला आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीची मागणीही सुकेशने केली आहे. त्याच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीच्या तिहार कारागृहातून नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहलं आहे. त्या पत्रात आपचे नेते सत्येंद्र जैन यांनी १० कोटी रुपये तुरुंगात सुरक्षित राहण्यासाठी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपला ५० कोटी रुपयांची देणगी दिल्याचंही सुकेशने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
Eknath Shinde criticized opposition claiming elections sealed Dhanushyaban and Shiv Sena s fate
राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा

हेही वाचा : शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात…

सुकेशने आपल्या पत्रात म्हटलं, “२०१५ सालापासून सत्येंद्र जैन यांना मी ओळखत आहे. त्यांनी दक्षिण भारतात मोठे पद आणि राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलं होते. यासाठी आपला ५० कोटी रुपयांची देणगीही दिली होती. त्यानंतर २०१७ साली मला अटक करण्यात आली, तेव्हापासून मी तिहार तुरुंगात आहे.”

हेही वाचा : ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

“तत्कालीन तुरुंग मंत्री सत्येंद्र जैन यांनी माझी अनेकदा भेट घेतली. २०१९ सालीही सत्येंद्र जैन यांनी माझी भेट घेतली. त्यांचे सचिव सुशील यांनी तुरुंगात सुरक्षितपणे राहण्यासाठी दरमहा २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर माझ्यावर दबाव टाकून दोन ते तीन महिन्यांत १० कोटी रुपये वसुल करण्यात आलं. हे सर्व पैसे जैन यांचा कोलकात्यातील निकटवर्तीय चतुर्वेदी याच्याकडे दिले,” असेही चंद्रशेखर याने म्हटलं आहे.

Story img Loader