कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पुलित्झर’ पुरस्कार लोकसेवा क्षेत्रात अमेरिकेचा टेहळणी कार्यक्रम उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने दिलेल्या माहितीच्या आधारे बातम्यांची मालिका सादर करणाऱ्या ‘द वॉिशग्टन पोस्ट’ व ‘द गाíडयन’ या वृत्तपत्रांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार दहा हजार डॉलरचा आहे.
‘ब्रेकिंग न्यूज’ गटातील पुरस्कार ‘बोस्टन ग्लोब’ या अमेरिकी वृत्तपत्रास बोस्टन मॅरेथॉन बातमीच्या वार्ताकनासाठी जाहीर झाला. देशातील दोन मोठी व मानाची वर्तमानपत्रे असलेल्या ‘द वॉिशग्टन पोस्ट’ व ‘न्यूयॉर्क टाईम्स’ यांना प्रत्येकी दोन ‘पुलित्झर’ मिळाले असून उर्वरित पुरस्कार छोटय़ा प्रकाशनांना गेले आहेत. एनएसएच्या हेरगिरी कार्यक्रमाचा पर्दाफाश करून व्यक्तिगतता व सुरक्षा यांच्यातील समतोलाचे महत्त्व या वृत्तपत्रांनी स्पष्ट केले, असे पुलित्झर पारितोषिकाचे प्रशासक सिग गिसलर यानी सांगितले. एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेच्या ओबामा प्रशानाकडून सामान्य लोकांच्या इमेल व दूरध्वनीवर जी पाळत ठेवली जात होती त्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले होते; त्याआधारे ‘द वॉिशग्टन पोस्ट’चे बार्टन गेलमन व अमेरिकेतील ‘द गाíडयन’मध्ये ग्लेन ग्रीनवॉल्ड, लॉरा पॉइट्रस व इवेन मॅकआस्कील यांनी त्याबाबत बातम्या दिल्या होत्या.
स्नोडेन यांच्या समर्थकांनी त्याच्या या गौप्यस्फोटाची तुलना १९७१ च्या व्हिएतनाम युद्धाच्यावेळच्या पेंटगॉन पेपर्सची द न्यूयॉर्क टाइम्सने जी कागदपत्रे प्रसिद्ध केली होती त्यांच्याशी केली आहे. त्या वेळी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला पुलित्झर पारितोषिक मिळाले होते.
छायाचित्राचा पुलित्झर पुरस्कार न्यूयॉर्क टाईम्सचे जोश हॅनेर यांना बोस्टन मॅरेथॉन या स्फोटात पाय गमावलेल्या व्यक्तीवरील छायाचित्र फीचरला मिळाला.
छायाचित्राच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज देण्याच्या गटात ‘टायलर हिक्स’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या छायाचित्रकाराला पुरस्कार मिळाला. त्याने केनियात वेस्टगेट मॉल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी छायाचित्रातून दिली होती. वॉिशग्टन पोस्टला अमेरिकेतील फूड स्टॅम्प प्रकरणाची सखोल बातमी दिल्याबद्दल दुसरे पुलित्झर स्पष्टीकरणात्मक वार्ताकन गटात मिळाले. एली सासलो यांनी ती बातमी दिली.
शोध पत्रकारितेचा पुरस्कार द सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रेटीच्या ख्रिस हॅम्बे यांना मिळाला. त्यांनी, वकील व डॉक्टरांनी कोळसा खाणकामगारांना काळ्या फुफ्फुसाच्या रोगापासून वाचण्यासाठी फायदे मिळू नयेत यासाठी व्यवस्था कशी काबीज केली होती यावर प्रकाश टाकला होता. राष्ट्रीय वार्ताकनासाठी ‘गॅझेट ऑफ कोलॅराडो िस्प्रग्ज’चे डेव्हीड फिलीप यांना पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय वार्ताकनासाठीचा पुरस्कार जॅसन झेप व अँड्रय़ू आरसी मार्शल या रॉयटरच्या बातमीदारांना म्यानमारमधील मुस्लीम अल्पसंख्याकांविरूद्ध िहसाचाराच्या वार्ताकनासाठी दिला आहे. संपादकीय लेखनाचा पुरस्कार ओरेगॉन पेन्शन फंडातील सुधारणांवरील लिखाणासाठी ‘द ओरेगॉनियन’ला दिला आहे.
द टम्पा बे टाइम्सच्या विल बॉबसन अँड मायकेलला फोर्जयिा स्थानिक वार्ताकनासाठी पुरस्कार मिळाला. बेघरांना घरे देण्याबाबतचा प्रश्न त्यांनी हाताळला होता. समीक्षणाचा पुरस्कार द फिलाडेल्फिया इन्क्वायररच्या इंगा सॅफ्रॉन यांना मिळाला.संपादकीय व्यंगचित्रणासाठी शार्लट ऑब्झव्‍‌र्हरच्या केविन सीयर्स यांना पुरस्कार मिळाला. फीचर लेखनासाठी यंदा पुरस्कार कुणालाच मिळाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१५ एप्रिलचा असाही  योगायोग
बोस्टन मॅरेथॉनदरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात ‘बोस्टन ग्लोब’ या वृत्तपत्राला ‘ब्रेकिंग न्यूज’ चा ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे बोस्टन मॅरेथॉनच्या घटनेला मंगळवारी, १५ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्या घटनेत तीनजण ठार तर  २६०  जण जखमी जाले होते. त्यामुळे एक मिनिटभर शांतता पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  छायाचित्र वर्गात जोश हॅनर या न्यूयॉर्क टाइम्सच्या छायाचित्रकारास पुलित्झर पुरस्कार मिळाला, त्याने या स्फोटातील पाय गमावलेल्या व्यक्तीवर छायानिबंधच सादर केला होता.

एनएसए’च्या बातम्या या एकीकडे आनंद देणाऱ्या व दुसरीकडे भीतीची छाया असलेल्या वर्षांतील बातमीदारीचा नमुना आहे. या प्रवर्गात पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. लोकांना व्यक्तिगततेचा अधिकार असला पाहिजे. लोकशाहीतही
गुप्तचरांना सर्वसामान्य लोकांचे फोन व इंटरनेट यातील माहिती चोरून मिळवण्यात काही सीमा असल्या पाहिजेत, हा विश्वास आम्हाला होता व त्या भूमिकेचा विजय झाला आहे.    – द वॉिशग्टन पोस्टचे बार्टन गेलमन

घबराटीच्या वातावरणातही या वार्ताहरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धर्याला माझा सलाम. सरकारने यात संबंधित साहित्य नष्ट करण्यात यावे अशी धमकावणीही दिली होती. पत्रकारांना थोपवण्यासाठी दहशतवादविरोधी कायदे व इतर मार्ग वापरून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अमेरिकेतील पत्रकारितेचे सर्वात प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळवणाऱ्या पत्रकार सहकाऱ्यांनी सरकारमध्ये लोकांची भूमिका असली पाहिजे, हे पटवून दिले आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेचा विजय झाला आहे. –  एडवर्ड स्नोडेन

अतिशय आश्चर्यकारक बातमी आहे. स्नोडेनच्या धर्याचा हा विजय आहे. सरकार काय करीत आहे हे दाखवण्यासाठी स्नोडेनने केलेले काम अतुलनीय आहे.   
-लॉरा पॉइट्रस

स्नोडेनने बेकायदेशीर वर्तन केले होते व त्याने जमा केलेल्या माहितीवर आधारित वृत्तास  हा पुरस्कार मिळायला नको होता. त्याने प्रतिज्ञेचा भंग करून अमेरिकी लोकांचे जीव धोक्यात आणले.
रिपब्लिकन नेते पीटर किंग, न्यूयॉर्क

पुलित्झर पुरस्कार २०१४ : पत्रकारिता
* लोकसेवा – दोन पुरस्कार ( द गार्डियन अमेरिका व द वॉशिंग्टन पोस्ट)
* ब्रेकिंग न्यूज वार्ताकन- द बोस्टन ग्लोब कर्मचारी ( बोस्टन मॅरॅथॉन बॉम्बस्फोट बातमीसाठी)
* शोध पत्रकारिता- ख्रिस हाम्बी- (द सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रिटी, वॉशिंग्टन)
* स्पष्टीकरणात्मक वार्ताकन- एली सासलो ( द वॉशिंग्टन पोस्ट)
* स्थानिक वार्ताकन-  विल हॉबसन व मायकेल लाफोरगिया ( द टॅम्पा बे टाइम्स)
* राष्ट्रीय वार्ताकन – डेव्हिड फिलिप्स ( द गॅझेट, कोलॅरॅडो स्प्रिंग)
* आंतरराष्ट्रीय वार्तांकन- जॅसन झेप व अँड्रय़ू आर. सी. मार्शल-रॉयटर)
* फीचर लेखन – कुणालाही नाही
* भाष्य- स्टीफन हेंडरसन (द डेट्रॉइट फ्री प्रेस)
* समीक्षा – इंगा सॅफ्रॉन  (द फिलाडेल्फिया इन्क्वायरर)
* संपादकीय लेखन – द ओरेगॉनियनचे संपादकीय कर्मचारी- पोर्टलँड
* संपादकीय व्यंगचित्र- केविन सियर्स – द शार्लट ऑब्झव्‍‌र्हर
* ब्रेकिंग न्यूज छायाचित्रण-  टायलर हिकस – द न्यूयॉर्क टाईम्स
* फीचर छायाचित्रण- जॉश हॅनेर – द न्यूयॉर्क टाइम्स

पुस्तके, नाटक व संगीत
* कादंबरी- द गोल्डफिंच- दोना टार्ट (लिटल, ब्राउन)
* नाटक- द फ्लिक- अ‍ॅनी बेकर
* इतिहास- द इंटरनल एनेमी- स्लॅव्हरी अँड वॉर इन व्हर्जिनिया १७७२-१८३२- अ‍ॅलन टेलर (नॉर्टन)
* जीवनचरित्र- मार्गारेट फूलर- अ न्यू अमेरिकन लाइफ- मेगन मार्शल (हॉटन मिफलिन हारकोर्ट)
* कविता – थ्री सेक्शन- विजय शेषाद्री (ग्रेवूल्फ प्रेस)
* इतर लेखन -टॉम्स रिव्हर – अ स्टोरी ऑफ सायन्स अँड सालव्हेशन- डॅन फॅगिन ( बँटम बुकस)
* संगीत- बिकम ओशन- जॉन ल्यूथर अ‍ॅडम्स (तैगा प्रेस- थिओडोर फंट्र म्युझिकल लिटरेचर).