पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम यांच्या गाडीवर बुधवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये वासिक अक्रमला कोणतीही दुखापत झाली नसून, त्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे. कराचीमधील करसाझ भागामध्ये ही घटना घडली.
वासिम अक्रम गोलंदाजीच्या सराव शिबिरासाठी कराचीतील मैदानाकडे निघाला होता. त्यावेळी समोरून आलेल्या एका गाडीने त्याच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर त्याच गाडीतील लोकांनी उतरून वासिम अक्रमच्या गाडीवर गोळीबार केला. गाडीच्या मागच्या बाजूवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे त्याच्या गाडीचे मागचे टायर फुटले. या घटनेनंतर वासिम अक्रम याने पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याने हल्लेखोरांच्या गाडीचा क्रमांकही लिहून घेतला आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्याला कोणत्याही व्यक्तीकडून धमकी आलेली नव्हती, असे त्याने स्पष्ट केले आहे.
वासिम अक्रमच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम यांच्या गाडीवर बुधवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

First published on: 05-08-2015 at 06:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram escapes unhurt after two men open fire at his car in karachi