स्वतंत्र भारतातील परिकथेप्रमाणे भासणाऱ्या शाही विवाहसोहळ्यात या लग्नसोहळ्याचा नक्कीच अव्वल स्थानावर समावेश होईल. राजीव गांधी आणि सोनिया मैनो (सोनिया गांधी) यांचा १९६८ साली पार पडलेला हा लग्नसोहळा असून, ‘एपी’ वृत्तसंस्थेच्या संग्रहित व्हिडिओंमधून, ब्रिटिश मुव्हिटोनने अलीकडेच या लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. त्याकाळी सामान्यांपासून खूप दूर असलेल्या श्रीमंतांच्या विश्वात डोकावण्याची संधी या व्हिडिओमुळे मिळते. राजीव आणि सोनिया गांधींच्या लग्नसोहळ्याच्या या व्हिडिओमध्ये त्यावेळचे राष्ट्रपती झाकीर हुसेन, राजीव गांधींचे बंधू संजय गांधी, विजयालक्ष्मी पंडीत आणि सोनिया गांधी यांचे कुटुंबीय नजरेस पडतात. सोनिया गांधींचे वडील या लग्नाला उपस्थित नव्हते.
पाहा : राजीव आणि सोनिया गांधी यांच्या लग्नसोहळ्याचा दुर्मिळ व्हिडिओ
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा परिकथेप्रमाणे भासणारा शाही विवाहसोहळा.
Written by दीपक मराठे
Updated:
First published on: 12-10-2015 at 04:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch an archival video of rajiv and sonia gandhi