देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. १९ एप्रिलपासून देशभर लोकशाहीचा सर्वांत मोठा सण साजरा केला जाणार आहे. सात टप्प्यांत हे मतदान पार पडणार असून त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियोजनही केलं आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका लागताच सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. तर, भारताबाहेरही निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लंडनमध्ये एका कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाच्या युकेतील ओव्हरसीज फ्रेंड्स ने या कार रॅलीचं आयोजन केलं होतं. या कार रॅलीतून भाजपाला अतूट पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

या रॅलीची सुरुवात नॉर्थॉल्ट येथील कच्छ लेवा पाटीदार समाज संकुलापासून झाली आणि नियाडेन येथील BAPS स्वामीनारायण मंदिर येथे समारोप झाला. ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, एकता आणि उत्साह दर्शवण्यासाठी सांस्कृतिक प्रदर्शनांसह रॅलीची सुरुवात झाली. देशातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवणाऱ्या या रॅलीमध्ये २५० हून अधिक कार सहभागी झाल्या होत्या. रॅलीत सहभाग घेतलेल्या ब्रिटनमधील सदस्यांनी भारतीय तिरंगा तसेच भाजपचे झेंडे हातात घेतले होते.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?

तसेच रॅलीमध्ये भाग घेऊन, यूकेचे संसदपटू आणि पद्मश्री बॉब ब्लॅकमन यांनी कार रॅली लंडनमधील BAPS स्वामीनारायण मंदिरात संपल्यानंतर भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व आणि त्यांच्या मातृभूमीचे भविष्य घडवण्यात भारतीय समुदायाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर भर दिला.

निवडणूक आयोगाने (EC) लोकसभा निवडणुकीच्या तारखा अधिसूचित केल्याच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या समर्थनार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा >> ‘जय श्रीरामा’च्या घोषणा देत आंतरराष्ट्रीय मुस्लीम विद्यार्थ्यांवर गुजरातमध्ये हल्ला, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

भाजपा ४०० पार करणार

ब्लॅकमन म्हणाले, “भारतीय निवडणूक ही एक प्रचंड निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा जास्त बहुमतासह विजयी ठरेल. आता भारत आणि युनायटेड किंगडममधील मैत्री अधिक घट्ट होत आहे जेव्हापासून आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत आणि भाजपने भारतात सत्ता मिळवली आहे.”

ते म्हणाले की, यूके भारताकडे ‘विलक्षण वाढणारी अर्थव्यवस्था’ म्हणून पाहत आहे, नवी दिल्ली आणि लंडन मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत आणि संरक्षण आणि सुरक्षेतील सहकार्यावर यापूर्वीच मैत्री करारावर स्वाक्षरी केली आहे.

“जुने वाईट दिवस आता संपले आहेत. आम्ही भारताकडे आता एक विलक्षण वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहतो आणि ती अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे. अजूनही आम्ही युनायटेड किंगडम आणि भारतातील आमचे मित्र यांच्यात वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असंही ब्लॅकमन म्हणाले.