गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र,  स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या. कारने दिलेली धडक इतकी जोरदार होती की तरुणी हवेत उडाल्या आणि कारच्या बोनेटवर आदळल्या. स्कुटीदेखील १० फुटाहून जास्त दूर फेकली गेली. सुदैवाने या तरुणी अपघातातून बचावल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दोन तरुणी अँगल थिएटरच्या दिशेने अॅक्टिव्हावर जात असताना अचानक भरधाव कारने त्यांच्या अॅक्टिव्हाला धडक मारली. कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना सावरायला अवधीच मिळाला नाही. अपघातस्थळी लोक नसल्याने वाहनचालकाने अपघातानंतर गाडी अजिबात न थांबवता पळ काढला. दोन्ही तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधरावर पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

Story img Loader