काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सर्वोच्च निवडणूक मंडळाने माजी पंतप्रधान यांना मोठा दणका दिला होता. परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम लपवून ठेवल्याचा ठपका इम्रान खानवर यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी निवडणूक मंडळाने पाच वर्षासाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवलं होते. त्यानंतर आता इम्रान खान यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

इम्रान खान यांनी सरकारच्या विरोधात एका मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी इम्रान खान यांनी वकिलांना निमंत्रण दिलं. तेथून बाहेर पडताना तेथे असलेल्या लोकांनी इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी नागरिकांनी घोषणाबाजी केली. लोकांनी त्यांच्याविरोधात ‘घडी घडी चोर’च्या अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना तेथून हाकलून लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा : एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी

काय आहे इम्रान खान यांच्यावर आरोप?

२०१८ साली इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. तेव्हा वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. या भेटवस्तू इम्रान खान यांनी स्वत: विकलेल्या. ही बाब निवडणूक मंडळसमोर गेली होती. त्यानंतर मंडळाने त्यांच सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.