चालत्या बसमध्ये परिस्थितीचा फायदा घेऊन छेडछाड करणाऱया तीन तरुणांची धुलाई करणाऱया दोन बहिणींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कॉलेज परिसरात अशा टवाळखोरांच्या छेडछाड प्रकरणांना सामोरे जावे लागण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. परंतु, येथे या दोघी बहिणींनी छेडछाड करणाऱया तरुणांना शिकवलेला धडा अत्याचाराविरोधात गप्प न बसता जशासतसे प्रत्युत्तर देणाऱया रणराणिंचे दर्शन घडवतो.
हरियाणाच्या रोहतकमध्ये कॉलेज संपवून पूजा आणि आरती या दोन बहिणी आपल्या थानाखुर्द गावी बसने परत जात होत्या. त्यावेळी तीन तरुणांनी छेडछाड करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला दोघींनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले परंतु, प्रकरण आणखी वाढू लागल्यानंतर त्या दोघींनी छेडछाडीला विरोध केला. बसमध्ये कोणीही विरोधाचा आवाज उठवू शकण्याचा धाडस नसल्याचा गैरसमज बाळगणाऱया त्या तिघा तरुणांची हमरीतुमरीवर उतरण्यापर्यंत मजल गेली. अखेर बसमधील एकमेव गर्भवती महिला त्या तरुणींच्या बाजूने बोलली. तिच्याशी त्यांनी गैरवर्तन करताच या भगिणींनी लाथबुक्क्या आणि बेल्टने तिन्ही तरुणांची धुलाई केली.
दरम्यान, या युवतींनी महिलांचा हेल्पलाईन क्रमांक १०९१ वर फोन करण्याचाही प्रयत्न केला. बसमधील एकाने हा संपूर्ण प्रकार कॅमेराज बंदिस्त केला आणि त्याआधारे या तरुणांची ओळख पटविण्यात आली. हरियाणा पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे गुन्हा नोंदविला आणि तिघाही नराधमांना अटक केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा