काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद चक्क ‘कल हो ना हो’  चित्रपटातील गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओत खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारली आहे.
या व्हिडिओतील सैफची भूमिका करणारे तर कळले पण, यात शाहरूखच्या भूमिकेत स्वत: भारतातील राजदूत मायकल स्टॅनर आहेत, तर त्यांची पत्नी एलिस यांनी प्रीती झिंटाची भूमिका साकारली आहे. राजदूत स्टेनर यांचे ‘कल हो ना हो‘ या चित्रपटातील टायटल साँग प्रचंड आवडते.  स्टॅनर यांनी बॉलिवूडचे १५०पेक्षा अधिक चित्रपट पाहिले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी शाहरुखच्या प्रत्येक स्टेप जशास तशा केल्या आहेत.’लिबं येत्सस-कल हो ना हो‘ असे या व्हिडिओला नाव देण्यात आले आहे.  या व्हिडिओच्या प्रसिद्धी कार्यक्रमाला शर्मिला टागोर, सैफ अली खान, जावेद अख्तर, मधू किश्वार आणि दिग्दर्शक सुमीत ओस्मांड शॉ हे उपस्थित होते.
सलमान खुर्शीद यांनी अभिनय केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजकारण ज्या प्रमाणे उद्या काय होणार आहे, हे आपण सांगू शकत नाही. तसेच आयुष्याबाबतही आहे. त्यामुळे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आजच पूर्ण आयुष्य जगून घ्या, पुढचे कोणी पाहिले आहे, हा संदेश दिला आहे, असे सलमान खुर्शिद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा