धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे व्यास नदीला अचानक आलेल्या पूरामध्ये २४ विद्यार्थी वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. गेल्या दोन दिवसांपासून वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत.
नदीमध्ये पाणी सोडताना काठावरील गावांमध्ये भोंगा वाजवून सूचना देण्याची पद्धत त्या परिसरात अवलंबिली जाते. रविवारी सायंकाळी पाणी सोडताना असा भोंगा वाजवला गेला नाही, असे गावक ऱ्यांचे म्हणणे आहे. असे वारंवार होते, असेही त्यांनी सांगितले आहे. हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे वीस विद्यार्थी कुलू येथे सहलीसाठी गेले होते. नदीकाठी गेल्यानंतर पाण्यात डुंबण्याची अनावर इच्छा होणे हे त्या वयाचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणायला हवे. हे तरुण पाण्यात तर गेलेच नाहीत, परंतु काठावर असतानाच काही मिनिटांतच नदीला प्रचंड प्रमाणात पाणी आले. पाणी वाढते आहे, हे कळल्यानंतर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा अवधीही या तरुणांना मिळाला नाही आणि त्यात ते वाहून गेले. या भयावह प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे…

Story img Loader