मानवी कृतींमुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी व वनस्पती पुढील शतकात नष्ट होतील, हा समज चुकीचा असून प्राणी व वनस्पती नष्ट होण्याच्या प्रक्रियेच्या वेगाबाबत बराच अतिरंजितपणा आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
 प्राणी व वनस्पती पुढील शतकात नष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करताना ज्या बेट जैवभौगोलिक सिद्धांताचा (आयलंड बायोजिऑग्राफिक थिअरी) आधार घेतला आहे, तो पाण्याने वेढलेल्या बेटांवर आधारित असून त्यात इतर भूभागांवर प्राणी व वनस्पती यांच्या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा नष्ट होण्याचा वेग हा वेगळा असणार आहे. तुलनेने बेटांवर परिसंस्थेला जास्त लवकर धोका आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
जैवभौगोलिक सिद्धांतात कृषी क्षेत्रातील संवर्धन व जैवसंवर्धनाबाबतची धोरणे चुकीचे आकलन करण्यात आले, त्याचे कारण या सिद्धांताचा वापर हे आहे. बेटांवर जेवढय़ा प्राणी व वनस्पती यांच्या प्रजाती आहेत, त्यांच्या तुलनेत भूभागावर जास्त प्रजाती आहेत व त्या मूळ प्रजाती आहेत असे ‘स्टॅनफोर्ड वूडस इन्स्टिटय़ूट फॉर द इनव्हिरॉनमेंट’ या संस्थेच्या एलिझाबेथ हॅडले यांनी सांगितले. त्यांनी उलट वेगळेच मत व्यक्त करताना मानवी हस्तक्षेपाने जमिनीच्या ज्या रचना बदलल्या, त्यामुळे उलट जैविक विविधता वाढली, पर्यावरणात्मक जोखीम व मानवी कारणांनी झालेले बदल यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यायी पण योग्य असा सिद्धांत तयार करायला हवा. शेतजमीन व वनांचे अवशेष हे जैविक विविधतेसाठी महत्त्वाचे आहेत, असे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॅनिएल कार्प यांनी म्हटले आहे.
 जर कॉफीचे मळे व मानवनिर्मित अधिवास हे वन्यजीव व आपल्यासाठी काही कामाचे नाहीत असे आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असे स्टॅनफर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी चेस मेंडेनहॉल यांनी सांगितले.
 बेट सिद्धांतांचा पडताळा घेण्यासाठी वैज्ञानिकांनी कोस्टारिकातील वटवाघळे व पनामातील मोठय़ा सरोवरातील बेटांचा अभ्यास केला. त्यांच्या मते वटवाघळे नष्ट होणाऱ्या वनांबाबत संवेदनशील असतात. एकूण २९ संशोधनात वटवाघळांच्या ७०० प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. हे संशोधन ‘नेचर’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा