दिल्लीकरांसाठी कामं केल्यामुळं आम आदमी पार्टीचा (आप) विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तसेच आजच्या निकालांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपचं पारडं जड दाखवल्यामुळे आपच्या नेत्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, निकालाला सुरुवात होण्यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी आपल्या घरी पुजाअर्चा केली त्यानंतर ते घराबाहेर पडले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण, गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत.

राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होईल अशी आशा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे भाजपा ५५ जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader