चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे. या पाण्याचा साधन संपत्ती समजायचं का? हे अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेलं नाही. मात्र चंद्रावर पाणी सापडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे असंही नासाने म्हटलं आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट काही वेळापूर्वीच करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.
NEWS: We confirmed water on the sunlit surface of the Moon for the 1st time using @SOFIAtelescope. We don’t know yet if we can use it as a resource, but learning about water on the Moon is key for our #Artemis exploration plans. Join the media telecon at https://t.co/vOGoSHt74c pic.twitter.com/7p2QopMhod
— Jim Bridenstine (@JimBridenstine) October 26, 2020
अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही २०२४ पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.
नासाने नेमकं काय म्हटलं आहे?
चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.