शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांचाही मोठा गट बाहेर पडणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य करत महत्वाची माहिती दिली आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय. शिंदे आज शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सर्व खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली असतानाच सोमवारी रात्री शिंदे सुद्धा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र

आधी आमदार आता खासदार…
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपाबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्येही फूट पडली.

Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिंदेंना बैठकीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले?
शिंदे गटाच्या बैठकीत जवळपास १२ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावल्याची माहिती सोमवारी समोर आली. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वप्रथम जाहीर मागणी करणारे राहुल शेवाळे यांच्याकडे शिंदे गटातील खासदारांचे गट नेतेपद देण्यात येईल अशी चर्चा आहे. विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे हे सहा खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात आले.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

मात्र मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेच्या १२ खासदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का, असे विचारता त्यांनी हसून उत्तर दिलं. “शिवसेनेचे खासदार आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत १२ नाही तर एकूण १८ खासदार आहेत,” असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

शिवसेनेच्या बैठकीला पाच खासदार
शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता शिंदे यांनी या १२ खासदारांबरोबरच अन्य ६ खासदारही आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय.

नक्की पाहा >> Video: “तुम्ही मला…”; गुवाहाटीचा उल्लेख करत चिमुकलीने अशी काही मागणी केली की मुख्यमंत्री शिंदे नि:शब्द झाले अन्…

उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
खासदारांमध्ये फूट पाडून शिंदे गटाने शिवसेनेला दुसरा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचेही लक्ष असेल.

Story img Loader