शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांचाही मोठा गट बाहेर पडणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य करत महत्वाची माहिती दिली आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय. शिंदे आज शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सर्व खासदार पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली असतानाच सोमवारी रात्री शिंदे सुद्धा दिल्लीत दाखल झाले. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिलीय.
नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा