एन. श्रीनिवासन यांचे जावई आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत श्रीनिवासन यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आज (बुधवार) म्हणाले. “आम्ही त्यांना या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत पायउतार होण्याची विनंती केली आहे, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.”, असंही शुक्ला पुढे म्हणाले.  
या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून त्यांनी दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात येईल असंही शुक्ला म्हणाले.
समितीने दिलेल्या अहवालाची बीसीसीआयकडून पडताळणी न करता त्याची तडक अंमलबजावणी करण्यात येईल.
यापूर्वीच नागरिकांकडून आणि प्रसारमाध्यमांकडून बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली आहे. त्यानंतर मंगळवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्रीनिवासन यांनी पायउतार व्हावे असे म्हटले होते. सिंधिया हे मध्य प्रदेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख असून बीसीसीआयच्या फायनान्स कमिटीचेही अध्यक्ष आहेत.   
माझ्या मते, या प्रकरणात कोणीच दोषी नाही असे मी एक क्षणसुध्दा विचार करू शकत नाही. असे असले तरी, खेळासाठी, संघासाठी आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवदद्ल, संघाबदद्ल आणि संघप्रमुखाबद्दल बोलले जात असताना आणि कुटुंबातील व्यक्ती या प्रकरणातमध्ये अडकली असताना श्रीनिवासन यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हायला हवे, असं सिंधिया म्हणाले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा