आज आपण जुन्या संसदेला निरोप देत आहोत. मात्र या वास्तूला खूप मोठा इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाला त्या घटनेचा साक्षीदार हा सेंट्रल हॉल आहे. या सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या तिरंगा, भारताचं राष्ट्रगीत यांचा स्वीकार झाला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंग या हॉलने आणि या इमारतीने पाहिले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेतल्या सेंट्रल हॉल सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. १८ सप्टेंबरपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट्रल हॉलमधून खासदारांना संबोधित केलं. त्याआधी जुन्या संसदेत फोटोसेशनही झालं. आजपासून नव्या संसदेत कामकाज सुरु होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्यात त्यांनी सेंट्रल हॉलचा इतिहास आत्तापर्यंत तयार करण्यात आलेले कायदे या सगळ्यांवर भाष्य केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा